Advertisement

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणारी माणसं

झेंड्याचा अपमान होऊ नये यासाठी वांद्रे पुर्व येथील 'केअर फाउंडेशन' नावाच्या एका सामाजिक संस्थेनं १५ ऑगस्ट २०१२ मध्ये 'राष्ट्रध्वज सन्मान रॅली' या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमातंर्गत या संस्थेचे कार्यकर्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेले झेंडे उचलतात आणि एकत्र करतात.

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणारी माणसं
SHARES

१५ ऑगस्ट म्हणजे भारताचा 'स्वातंत्र्य दिन'. यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन ७२ वर्षे पुर्ण झाली. या दिवशी भारतातील शाळा, महाविद्यालये, सामजिक संस्था, ऐतिहासिक ठिकाणे तसंच सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण मोठ्या आदरानं, आपुलकीनं साजरा करतात. पण ध्वजारोहण झाल्यावर आपल्याला झेंडे रस्त्यावर पडलेले पहायला मिळतात. मात्र, हे झेंडे कोणीच उचलत नाही. झेंड्यांवर नकळत लोकांचे पाय पडतात. यामुळं झेंड्याचा अपमान होतो.


https://m.facebook.com/story.php?story_fbid=259094804924122&id=963027840478621


झेंडे पुरून त्यावर रोपटं

झेंड्याचा अशा प्रकारे अपमान होऊ नये यासाठी वांद्रे पुर्व येथील 'केअर फाउंडेशन' नावाच्या एका सामाजिक संस्थेनं १५ ऑगस्ट २०१२ मध्ये 'राष्ट्रध्वज सन्मान रॅली' या उपक्रमाला सुरुवात केली. या उपक्रमातंर्गत या संस्थेचे कार्यकर्ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रस्त्यावर पडलेले झेंडे उचलतात आणि एकत्र करतात. यानंतर हे झेंडे मातीत पुरून त्यावर एक रोपटं लावतात.


पथनाट्याद्वारे जनजागृती

केअर फाउंडेशनकडून १५ ऑगस्ट २०१२ पासून 'राष्ट्रध्वज सन्मान रॅली' काढली जात आहे. या रॅलीमध्ये ३ वर्षांच्या मुलांसह अनेक कॉलेज विद्यार्थी सहभाग घेतात. ही रॅली सुरुवातीला वांद्रे आणि खार या परिसरात काढण्यात आली होती. या रॅलीत ही मुलं समाजानं झेंड्याचा मान राखावा याबाबत संदेश देण्यासाठी गल्लोगल्ली पथनाट्यदेखील सादर करतात. ही रॅली सकाळी १० वाजता सुरु होते आणि संध्याकाळी ६ वाजता संपते.  




२०१२ मध्ये जेव्हा आम्ही पहिली रॅली काढली होती. त्यावेळी आम्हाला एकूण १२०० झेंडे मिळाले होते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लोक फक्त दोन तासांसाठी झेंड्याचा मान ठेवतात. त्यानंतर हा झेंडा कुठे पडतो, कोणत्या अवस्थेत असतो याकडं कोणाचंही लक्ष नसतं.
 - अनिकेत भंकाळ , केअर फाऊंडेशन, अध्यक्ष



हेही वाचा -

छबिलदास शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा