Advertisement

शाळांच्या खासगीकरणाचा संकल्प, २५६९.३५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना सादर केला. या अर्थसंकल्पात विद्यमान योजनाच पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करत निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शाळांच्या खासगीकरणाचा संकल्प, २५६९.३५ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर
SHARES

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०१८-१९चा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना सादर केला. तब्बल २५६९.३५ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. मागील वेळेस शिक्षण विभागाचा २३११.६६ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या अर्थसंकल्पात विद्यमान योजनाच पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करत निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच बंद पडलेल्या ३५ शाळा लोकसहभागातून चालवण्याचा संकल्प करत महापालिकेने शाळांची खासगीकरणाकडे वाटचाल करण्याचे स्पष्ट संकेत दिले. 

मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानुसार ३८१ शाळांमध्ये एकूण ४,०६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसण्यात येणार आहेत. याशिवाय २४ आंतरराष्ट्रीय शाळा बांधणे आणि मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे.



सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन

महापलिकेच्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थिनींकरता १५९ शालेय इमारतीमध्ये १७२ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन आणि सॅनिटरी बर्निंग मशिन बसवण्यात आलेल्या आहेत. आता आगामी वर्षात इयत्ता ६ ते ८ वी च्या मुलींसाठी ३४५ इमारतींमध्ये ३८१ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवण्यात येणार आहेत.


सुरेख अक्षरासाठी अक्षरशिल्प प्रकल्प

महापालिका शालेय विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य प्रभावी होणं ही काळाची गरज असल्याने अक्षरशिल्प प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं लेखन सुवाच्य व वळणदार व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना सुलेखन वही, अक्षरखच पाटी, चार रेघी वह्या देण्यात येणार आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा होईल.


अर्थसंकल्पालाही सदस्य उशिरा

शिक्षण समितीची अर्थसंकल्प बैठक १२ वाजता आयोजित करण्यात आली होती. पण १२.२० वाजेपर्यंत भाजपाच्या आरती पुगावकर, सेनेच्या शीतल म्हात्रे, स्नेहल आंबेकर हे तीनच सदस्य हजर होते. त्यानंतर इतर सदस्य आल्यानंतर १२.२६ ला अध्यक्षा शुभदा गुढेकर उपस्थित राहिल्या.


अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये:

  • महापालिका शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास
  • डिजिटल क्लासरूम
  • शाळांमध्ये केंद्रीय ध्वनिक्षेपण यंत्रणा
  • विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश
  • टॉय लायब्ररी वर्ग
  • बेटी बचाव बेटी पढावो
  • व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क
  • प्रगत शाळा
  • कौशल्य विकास व व्यावसायभिमुख मार्गदर्शन
  • ५ शाळांचा विकास खासगी लोक सहभागातून
  • मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण
  • शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा
  • आंतरराष्ट्रीय शाळा
  • महापालिका शाळांच्या मुलांना फुटबॉल प्रशिक्षण
  • ३४५ शालेय इमारतीमध्ये ३८१ सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवणार
  • द्विभाषिक शाळा
  • अक्षरशिल्प प्रकल्प
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा