Advertisement

अवैध बांधकामप्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित


अवैध बांधकामप्रकरणी पालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित
SHARES

मुंबई - अवैध व अनधिकृत बांधकाम झाल्यास संबंधित विभागाच्या महापालिकेचे सहायक आयुक्त आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांना जबाबदार ठरवून कारवाई करण्याचे स्पष्ट परिपत्रक असूनही आजवर याप्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आली नव्हती. परंतु आता या परिपत्रकानुसारच सहाय्यक आयुक्तांचा पहिला बळी गेला आहे. घाटकोपरच्या 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशू द्विवेदी यांना अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याप्रकरणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी निलंबित केले आहे.

अवैध बांधकामांना संरक्षण देणाऱ्या एन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांना सोमवारी तडकाफडकी पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्याला निलंबन करण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. अवैध बांधकामांना संरक्षण दिल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी काही महिन्यांपूर्वी दिला होता. त्याची सुरूवात घाटकोपर येथील सहाय्यक आयुक्तांच्या निलंबनापासून झाली आहे.

पालिकेचा अधिनियम 304 नुसार रस्ते घोषित करायचे असतात. त्याबाबत द्विवेदी यांनी आयुक्त अजोय मेहता यांना अर्धवट माहिती दिल्याचे उपायुक्त नरेंद्र बर्डे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याशिवाय घाटकोपरमधील अवैध बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच पुनर्विकास आणि दुरूस्तीसाठी परवानगी नसतानाही काही बांधकामांना परवानगी दिल्याचे उघडकीस आले आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीची शक्यता

अवैध बांधकामांना संरक्षण देणाऱ्या सुधांशु द्विवेदी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची दाट शक्यता आहे. त्यानुसार त्यांची तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी पुढील चौकशी करण्यासाठीही समिती नेण्यात आली असून, ही समिती त्यांची गुन्हेगारी पाश्वभूमी तपासणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा