आदित्य ठाकरे वाटणार टॅब

 Sham Nagar
आदित्य ठाकरे वाटणार टॅब

जोगेश्‍वरी - खाजगी शाळांमधल्या विद्यार्थ्यांना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते 21 सप्टेंबरला टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. जोगेश्वरीतल्या श्रमिक विद्यालय, बालविकास विद्यालय, कनोसा हायस्कुल, वासुदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांना टॅब वाटप होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रविंद्र वायकर यांची ही संकल्पना आहे. या कार्यक्रमास खासदार गजानन किर्तीकर, विभागप्रमुख सुनिल प्रभू, साधना माने, उपविभागप्रमुख विश्वनाथ सावंत, अनंतराव भोसले, जोगेश्‍वरी विधानसभा संघटक रचना सावंत, स्थापत्य समिती अध्यक्ष बाळा नर आदी मान्यवरांची उपस्थिती असेल अशी माहिती आयोजकांनी दिली.

Loading Comments