SHARE

मुंबईत अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे किंवा अयोग्य विद्युत जोडणीमुळे आगी लागत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन तथा स्विच), वायरिंग याबद्दल अत्यंत सजग राहण्याच्या सूचना केल्या होत्या.

 मीटर केबीनसह ज्या ठिकाणाहून विद्युत जोडणी आपल्या जागेत येते, त्या ठिकाणी मेन स्विचबरोबरच एमसीबी तथा इएलसीबी हे तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत, असे अादेश महापालिका अायुक्तांनी २२ डिसेंबर २०१७ रोजी दिले होते. मात्र, अद्यापही कोणत्याही इमारतींमध्ये या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे ९ महिन्यांनी पुन्हा एकदा आयुक्तांना याबाबतचा फतवा काढण्याची वेळ आली आहे.


दुर्घटनेनंतर धोरण

परळमधील क्रिस्टल इमारतीच्या आग दुघर्टनेनंतर पुन्हा एकदा आयुक्त अजोय मेहता यांनी २२ डिसेंबर २०१७ ला काढलेला फतवा बाहेर काढला आहे. लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडसह अनेक ठिकाणच्या इमारतींमध्ये आग लागण्याचे प्रकार घडल्यामुळे आयुक्तांनी मार्गदर्शक धोरण जाहीर केले होते.


नियम संकेतस्थळावर

 विद्युत जोडणी व विद्युत उपकरणे, एलपीजी सिलिंडर, पाईप्ड नॅचरल गॅस, रॉकेल, डिझेल, कोळसा वा लाकूड यासारख्या विविध प्रकारच्या इंधनाचा वापर केला जातो. या इंधन प्रकारानुसार संबंधितांनी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाच्या काळजीबाबत आणि अनुषंगीक नियम, सूचना इत्यादींची मुद्देसूद माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती.


मुंबईकरांकडून प्रतिसाद नाही

यावेळी गॅस गळती शोधणारे अत्याधुनिक  गॅस लिकेज डिटेक्टर बसवण्याची सूचनाही करण्यात आली होती. विद्युत वायरींग आणि इलेक्ट्रीक फिटींगसह पीएनजीचा वापर, कोळसा, लाकूड, रॉकेल, डिझेल तसेच इलेक्ट्रीक भट्टीबाबतचे मार्गदर्शक धोरण जाहीर करण्यात अाले होते.  मात्र, ९ महिन्यांनंतर पुन्हा एकदा या धोरणांची अंमलबजावणी करण्याचा फतवा काढण्यात आला आहे. मात्र, या ९ महिन्यांच्या कालावधीत मुंबईकरांकडून याला फारसा प्रतिसाद मिळत नसून क्रिस्टल इमारतीच्या आगीच्या दुघर्टनेनंतर पुन्हा एकदा प्रशासनाला कडक भूमिका घेण्याची वेळ आली आहे.हेही वाचा - 

राणी बागेतील ७ दिवसांच्या पेंग्विनचा मृत्यू

म्हाडा भवनात पहिल्यांदाच फुटणार लाॅटरी, कोकण मंडळ सज्ज
संबंधित विषय
ताज्या बातम्या