Advertisement

म्हाडा भवनात पहिल्यांदाच फुटणार लाॅटरी, कोकण मंडळ सज्ज

यंदा कोकण मंडाळाची लाॅटरी म्हाडाच्या वांद्रयातील मुख्यालयात म्हणजेच म्हाडा भवनात होणार आहे. म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हाडा भवनात लाॅटरी फुटणार असून या लाॅटरीसाठी कोकण मंडळ सज्ज झाले आहे.

म्हाडा भवनात पहिल्यांदाच फुटणार लाॅटरी, कोकण मंडळ सज्ज
SHARES

म्हाडाची लाॅटरी म्हटलं की सर्वात पहिल्यांदा वांद्रयातील रंगशारदा सभागृह डोळ्यासमोर येतं. गेल्या कित्येक वर्षांपासून रंगशारदा सभागृहात म्हाडाच्या लाॅटरीचा कार्यक्रम दणक्यात होत आहे. पण यंदा कोकण मंडाळाची लाॅटरी म्हाडाच्या वांद्रयातील मुख्यालयात म्हणजेच म्हाडा भवनात होणार आहे. म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच म्हाडा भवनात लाॅटरी फुटणार असून या लाॅटरीसाठी कोकण मंडळ सज्ज झाले आहे. शनिवारी १० वाजता ही लाॅटरी फुटणार असून अर्जदाराचं लक्ष या लाॅटरीकडं लागलं आहे.


तंत्रज्ञानाचा वाढता वापर

म्हाडातर्फे याआधी चिठ्ठ्यांद्वारे लाॅटरी काढण्यात येत होती. त्यानंतर जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसंतसं म्हाडाची लाॅटरीही हायटेक होत गेली. त्यातूनच आॅनलाईन लाॅटरी पद्धती सुरू करत म्हाडानं लाॅटरी पारदर्शक आणि सोपी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आता अर्जदारांना घरबसल्या लाइव्ह लाॅटरी बघता येत आहे. निकाल आॅनलाईन कळतो आहे. लाॅटरीच्या दिवशी रंगशारदामध्ये वा त्याच्याही आधी वांद्रयाच्या समाजमंदिर सभागृहात अर्जदार मोठ्या संख्येनं गर्दी करत होते, तशी गर्दी गेल्या ३-४ वर्षात कमी होत चालली आहे.


लाइव्ह प्रक्षेपणामुळे निर्णय

ही कमी होणारी गर्दी आणि लाॅटरीचं लाइव्ह प्रेक्षपण यामुळं यंदा कोकण मंडळानं म्हाडा भवनात लाॅटरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शनिवारी म्हाडा भवनात फुटणारी लाॅटरी नेहमीच्या लाॅटरीपेक्षा वेगळी असणार हे नक्की.

ज्या अर्जदारांना लाॅटरी म्हाडा भवनात येऊन पाहायची आहे, त्यांची व्यवस्था कोकण मंडळानं केली आहे. म्हाडा भवनाच्या आवारात मंडप टाकण्यात आला असून एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर वेबकास्टींगच्या माध्यमातून लाॅटरी लाइव्ह पाहता येणार आहे.


कमी प्रतिसाद

९०१८ घरांसाठी कोकण मंडळाला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. ५५ हजार ३२४ इतकेच अर्ज सादर झाले असून कोकण मंडळाची महाग घरं इच्छुकांनी नाकारली आहेत. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान आवास योजनेतील घरांनाही थंड प्रतिसाद मिळाला आहे. पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी 'पीएमएवाय'अंतर्गत आधी नोंदणी करणं गरजेचं असतं आणि तेच न झाल्यानं अनेकजण अर्ज भरू न शकल्याचं कोकण मंडळाकडून स्पष्ट केलं जात आहे. असं असलं तरी म्हाडाच्या घरांना सध्या कमी प्रतिसाद मिळत असल्याचीच चर्चा दिसत आहे.



हेही वाचा-

अभिनंदन ! ७५४ अर्जदारांना लाॅटरीआधीच लाॅटरी

बिग बाॅस फेम शर्मिष्ठा ठरणार का म्हाडाची विनर?



http://mhada.ucast.in

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा