Advertisement

बापरे! म्हाडा कोकण मंडळाच्या १७३६ घरांसाठी अर्जच नाही

म्हाडाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लाॅटरी असताना दुसरीकडे या लाॅटरीतील तब्बल १७३६ घरांसाठी अर्ज न येणं ही कोकण मंडळावरील मोठी नामुष्की म्हणावी लागेल.

बापरे! म्हाडा कोकण मंडळाच्या १७३६ घरांसाठी अर्जच नाही
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लाॅटरीतील महागड्या घरांना थंड प्रतिसाद मिळाला असून इच्छुकांनी घर नाकारल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. कोकण मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या अर्जदारांच्या प्रारूप यादीतून हे समोर आलं आहे. या यादीनुसार ९०१८ घरांपैकी तब्बल १७३६ घरांसाठी शून्य प्रतिसाद अर्थात एकही अर्ज सादर झालेला नाही.


कुठली घरं नाकारली?

विरार-बोळींजमधील घरांसह पंतप्रधान आवास योजनेतील ठाणे जिल्ह्यातील घरांना अर्जदारांनी स्पष्टपणे नाकारलं आहे. त्यातही म्हाडा कर्मचारी, कलाकार, आजी- माजी लोकप्रतिनधी, राज्य सरकारचे कर्मचारी, पत्रकार, माजी सैनिक, संरक्षण दलातील मृत सैनिकांचे नातेवाईक-लढाईत अपंग झालेला जवान, अंध-अपंग अशा गटातील घरांसाठी प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जो काही प्रतिसाद मिळाला आहे तो सर्वसामान्य जनता, अनुसूचित जाती, अऩुसुचित जमाती या वर्गाकडून आलेला आहे.


म्हाडावर नामुष्की

म्हाडाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लाॅटरी असताना दुसरीकडे या लाॅटरीतील तब्बल १७३६ घरांसाठी अर्ज न येणं ही कोकण मंडळावरील मोठी नामुष्की म्हणावी लागेल. कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी ५५ हजार ३२४ अर्ज सादर झाले आहेत. त्यानुसार हे अर्जदार लाॅटरीत समाविष्ट झाले असून या अर्जदारांचं लक्ष आता २५ आॅगस्टकडे लागलं असेल.

ज्या घरांना प्रतिसाद मिळत नाही त्या घरातील सामाजिक आरक्षण वगळता इतर वर्गातील घर सर्वसामान्य गटातील प्रतिक्षा यादीवरील विजेत्यांना वितरीत केली जातात. असं असलं तरी घरांसाठी अर्जच न येणं हे कोकण मंडळावरील नामुष्कीच आहे.


रिकामी घरं 'अशी'


कलाकारांसाठी आरक्षित घर

 • संकेत क्रमांक २७० साठी ३८ घरं असताना केवळ ६ अर्ज प्राप्त. त्यामुळे ३२ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७१ साठी ४१ घर असताना केवळ ८ अर्ज प्राप्त. ३३ घरं रिकामी
 • संकेत क्रमांक २७५ साठी १० घरं शून्य अर्ज. १० ही घरं रिकामी
 • संकेत क्रमांक २७२ साठी १० घर असताना केवळ ४ अर्ज. ६ घरं रिकामी
 • संकेत क्रमांक २७४ साठी ७४ घरांसाठी २३ अर्ज. ५१ घरांना शून्य प्रतिसाद

शासकीय निवासस्थानात राहणारे, तीन वर्षांपूर्वी सेवा निवृत्त झालेल केंद्र सरकारचे कर्मचारी यांच्यासाठीची आरक्षित घरं

 • संकेत क्रमांक २७० साठी ३८ घरं केवळ २ अर्ज. ३६ घरं रिकामी
 • संकेत क्रमांक २७४ साठी १८६ घर असताना १२९ अर्ज. त्यामुळे ५७ घरांना प्रतिसादच नाही


म्हाडा कर्मचारी

 • संकेत क्रमांक २७१ साठी ३८ घरं असताना शून्य प्रतिसाद. ३८ घरही अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७१ साठी ४० घर, केवळ २ अर्ज सादर. ३८ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७३ साठी एक घर एकही अर्ज नाही. १ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७५ साठी १० घर केवळ १ अर्ज. ९ घरांना प्रतिसाद नाही
 • संकेत क्रमांक २७२ साठी १० घर, २ अर्ज. ८ घरांसाठी अर्ज नाही
 • संकेत क्रमांक २७४ मध्ये ७५ घर राखीव असताना केवळ १ अर्ज. ७४ घर अर्जाविना


आजी-माजी लोकप्रतिनिधी

 • संकेत क्रमांक २७० मध्ये ३८ घरं, शून्य अर्ज. ३८ घरं अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७१ साठी ४० घरं शून्य अर्ज. ४० घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७५ १० घर, एकही अर्ज नाही. १० ही घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७२ साठी ९ घर असताना एकही अर्ज नाही. ९ घरही अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७४ मध्ये ७४ घर आरक्षित असताना केवळ एक अर्ज. ७३ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७६मध्ये तीन घर असताना एक अर्ज सादर. २ घरं रिकामी


माजी सैनिक

 • संकेत क्रमांक २७० साठी ९५ घर असताना केवळ १० अर्ज सादर. ८५ घरं रिकामी
 • संकेत क्रमांक २७१ मधील १०२ घरांसाठी केवळ १५ अर्ज. ८७ घरं अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७३ मध्ये एक घर असताना शून्य अर्ज. १ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७५ मध्ये २५ घर, १९ अर्ज सादर. ६ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७४ साठी १८६ घर असताना केवळ ३६ अर्ज. १५० घरं रिकामी


 • संरक्षण दलातील मृत सैनिकांचे नातेवाईक वा लढाईत अपंग झालेला सैनिक
 • संकेत क्रमांक २७० साठी ३६ घर असताना केवळ ६ अर्ज. ३२ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७१ साठी ४० घर, अर्ज केवळ ६. ३४ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७३, एक घर शून्य अर्ज. १ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७२ साठी १० घर असताना केवळ ५ अर्ज. ५ घर रिकामी
 • संकेत क्रमांक २७४ साठी ७४ घर, अर्ज केवळ ९. ६५ घरं अर्जाविना


अंध-अपंग

 • संकेत क्रमांक २७० साठी ५७ घरांसाठी ३० अर्ज. २७ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७१ साठी ६१ घर असताना ५३ अर्ज. ८ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७४ साठी ११२ घर असताना ८८ अर्ज. २४ घर अर्जाविना


स्वातंत्र्य सैनिक

 • संकेत क्रमांक २७० साठी ४८ घर, शून्य अर्ज. ४८ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७१ साठी ५१ घर, अर्ज मात्र २. ४९ घरं अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७३ साठी एक घर, शून्य अर्ज. १ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७५ साठी १३ घरांसाठी केवळ २ अर्ज. ११ घरांना अर्ज नाही
 • संकेत क्रमांक २७२ साठी १२ घर, ३ अर्ज. ९ घरांसाठी शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७४ साठी ९३ घर, अर्ज एकही नाही. ९३ घर रिकामी


पत्रकार

 • संकेत क्रमांक २७० मध्ये४८ घर असताना केवळ ३ अर्ज. ४५ घरं पडून
 • संकेत क्रमांक २७१ साठी ५१ घर असताना ८ अर्ज. ४३ अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७५ मध्ये १३ घर, अर्ज मात्र ११. २ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७२ साठी १२ घर, ११ अर्ज. १ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७४ साठी ९३ घर, १२. ८१ घरांना शून्य प्रतिसाद


विमुक्त जमाती

 • संकेत क्रमांक २७० साठी २९ घर असताना केवळ १४ अर्ज. १५ घर अर्जाविना
 • संकेत क्रमांक २७१ साठी ३० घर, अर्ज २३. ७ घरांना शून्य प्रतिसाद
 • संकेत क्रमांक २७४ मध्ये ५६ घरं असताना २९ अर्ज. २७ घरं रिकामीहेही वाचा-

बिग बाॅस फेम शर्मिष्ठा ठरणार का म्हाडाची विनर?

मुदतवाढीनंतरही लाॅटरीकडे पाठ! ९०१८ घरांसाठी ६३९१३ इच्छुकांची नोंदणीRead this story in English
संबंधित विषय
Advertisement