Advertisement

बिग बाॅस फेम शर्मिष्ठा ठरणार का म्हाडाची विनर?

येत्या २५ आॅगस्टला म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी फुटणार आहे. त्यातील संकेत क्रमांक २७६, मध्यम गटातील घरासाठी शर्मिष्ठाने अर्ज केला असून ठाण्यातील बाळकुम भागातील या घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३२ रुपये इतकी आहे.

बिग बाॅस फेम शर्मिष्ठा ठरणार का म्हाडाची विनर?
SHARES

मराठी 'बिग बॉस' जिंकता आलं नसलं, तरी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतला वेध लागलेत ते म्हाडाची लाॅटरी जिंकण्याचे. छोटसं का होईना, पण आपलं हक्काचं घर असावं, या इच्छेतून शर्मिष्ठाने म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीत अर्ज भरल्याची माहिती खास 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.


आधी कुणाला लागलं घर?

मुंबई महानगरात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं असल्यास सर्वसामान्यांची पहिली पसंती असते ती म्हाडाच्या घरांची. एवढंच नव्हे, तर सेलिब्रिटी अर्थात कलाकारही म्हाडाकडे आकर्षित होतात. मुंबईतल्या घरांच्या लॉटरीसाठी मोठ्या संख्येने कलाकार अर्ज करतात. आतापर्यंत जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार, मिंलिंद शिंदे, प्रथमेश परब, विनीत भोंडे अशा एक ना अनेक कलाकाराचं घराचं स्वप्न म्हाडाने पूर्ण केलं आहे.



ठाण्यातही वाढतं प्रमाण

मुंबईतच प्रामुख्याने सिनेमा वा सिरिअलचं शुटिंग होत असल्याने कलाकार मुंबईतल्या घरांसाठी अर्ज करतात. पण ठाण्यातही शुटिंग आणि नाटकाच्या प्रयोगाचं प्रमाण वाढल्याने कलाकार म्हाडा लाॅटरीत अर्ज करू लागले आहेत. त्यानुसार आपणही ठाण्यातील घरासाठी अर्ज केल्याचं तिनं सांगितलं.


कुठे भरला फाॅर्म?

येत्या २५ आॅगस्टला म्हाडाच्या कोकण मंडळाची लाॅटरी फुटणार आहे. त्यातील संकेत क्रमांक २७६, मध्यम गटातील घरासाठी शर्मिष्ठाने अर्ज केला असून ठाण्यातील बाळकुम भागातील या घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३२ रुपये इतकी आहे.

मी स्वतः ला सेलिब्रिटी वैगरे मानत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांप्रमाणे मी देखील या योजनेचा लाभ घेत आहे, असं तिचं म्हणणं आहे. कोकण मंडळाच्या लॉटरीत शर्मिष्ठा वगळल्यास कोणतं मोठं नाव दिसत नसल्याने ती विजेती ठरते की नाही हेच पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.



हेही वाचा-

सिडकोच्या घरांसाठी तुफान प्रतिसाद; ७ दिवसांत ३५ हजार नोंदणी

सिडकोने बनवलं खास लाॅटरीसाठी 'अॅप'



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा