Advertisement

सिडकोच्या घरांसाठी तुफान प्रतिसाद; ७ दिवसांत ३५ हजार नोंदणी

घणसोली, द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर येथील सिडकोच्या घरासाठी १३ ऑगस्टपासून नोंदणीस सुरुवात झाली आहे. या नोंदणीला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ७ दिवसांत ३५ हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.

सिडकोच्या घरांसाठी तुफान प्रतिसाद; ७ दिवसांत ३५ हजार नोंदणी
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांच्या लॉटरीसाठीच्या नोंदणी, अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया नुकतीच संपली आहे. या लॉटरीसाठी अंदाजे ५५ हजार ३२० अर्ज सादर झाले असून हा प्रतिसाद थंड असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र, दुसरीकडे सिडकोच्या घरांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. केवळ एका आठवड्यात सिडकोकडे ३५ हजाराहून अधिक इच्छुकांनी नोंदणी केली आहे. तर केवळ ५ दिवसांत १० हजाराहून अधिक अर्ज सादर झाल्याची माहिती सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

१३ ऑगस्टपासून नोंदणी

कोकण मंडळाची घरं महाग असल्यानं आणि उत्पन्न गटानुसार किमतीत मोठी तफावत असल्यानं घरांना थंड प्रतिसाद मिळाला आहे. सिडकोच्या घरांवर मात्र मुंबईकर, नवी मुंबईकर आणि ठाणेकर उड्या मारताना दिसत आहेत. घणसोली, द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर येथील सिडकोच्या घरासाठी १३ ऑगस्टपासून नोंदणीस सुरुवात झाली आहे. या नोंदणीला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ७ दिवसांत ३५ हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे.


लाखाचा अाकडा पार ?

कोकण मंडळाच्या ९०१८ घरासाठी २८ दिवसामध्ये ६३ हजार ९१३ इच्छुकांनी नोंदणी केली आहे.  तिथं सिडकोच्या घरांनी केवळ 7 दिवसांतच ३५ हजाराचा आकडा गाठला आहे. म्हणजेच कोकण मंडळाच्या नोंदणीच्या ५० टक्क्यांहून अधिक नोंदणी ५ दिवसांत झाली आहे. तर हा आकडा लाखाचा पल्ला पार करेल असही म्हटलं जातं आहे.


१६ सप्टेंबरपर्यंत मुदत

दुसरीकडे कोकण मंडळाच्या घरासाठी ५५ हजार ३२० अर्ज सादर झाले आहेत. तिथं सिडकोकडे केवळ ५ दिवसात १० हजार अर्ज सादर झाले आहेत. हा प्रतिसाद खूपच मोठा मानला जात असून अर्जाचा आकडाही लाखाच्या घरात जातो का हे आता १६ सप्टेंबरलाच, अर्ज भरण्याची मुदत संपेल तेव्हाच समजेल.



हेही वाचा -

मेट्रो-२ बी विरोध: संतापलेले स्थानिक करणार 'नोटा'चा वापर

सिडकोने बनवलं खास लाॅटरीसाठी 'अॅप'



 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा