Advertisement

अभिनंदन ! ७५४ अर्जदारांना लाॅटरीआधीच लाॅटरी

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी अर्ज केलेल्या ५५ हजार अर्जदारांमधील तब्बल ७५४ अर्जदारांसाठी खुशखबर आहे. दरवर्षीप्रमाणे एखाद्या गटात जितकी घर आरक्षित आहेत त्या घरांसाठी तितके अर्ज वा शून्य प्रतिसाद मिळाल्यानं या ७५४ अर्जदारांना लाॅटरी लागली आहे.

अभिनंदन ! ७५४ अर्जदारांना लाॅटरीआधीच लाॅटरी
SHARES

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ९०१८ घरांसाठी ५५ हजार ३२४ अर्जदार २५ आॅगस्टला नशीब अजमावणार आहेत.  यंदा कोकण मंडळाला थंड  प्रतिसाद मिळाला असला तरी हे ५५ हजार अर्जदार लाॅटरीत सहभागी झाल्यानं आता त्यांची धाकधूक नक्कीच वाढली असेल. असं असताना या ५५ हजार अर्जदारांमधील तब्बल ७५४ अर्जदारांसाठी खुशखबर आहे. दरवर्षीप्रमाणे एखाद्या गटात जितकी घर आरक्षित आहेत त्या घरांसाठी तितके अर्ज वा शून्य प्रतिसाद मिळाल्यानं या ७५४ अर्जदारांना लाॅटरी लागली आहे. त्यामुळे या ७५४ अर्जदारांचं अभिनंदन.


अधिकृत घोषणा बाकी

कोकण मंडळानं प्रसिद्ध केलेल्या अर्जदारांच्या यादीनुसार म्हाडा कर्मचारी, कलाकार, आजी- माजी लोकप्रतिनिधी, राज्य सरकारचे कर्मचारी, पत्रकार, माजी सैनिक, संरक्षण दलातील मृत सैनिकांचे नातेवाईक-लढाईत अपंग झालेला जवान, अंध-अपंग गटातील घरांसाठी कमी अर्ज वा शून्य अर्ज सादर झाले आहेत. त्याअनुषंगाने आता ज्यांनी घरांची संख्या जास्त असताना कमी अर्ज सादर झाले आहेत, अशा घरासाठी अर्ज केला आहे, ते अर्जदार विजेते आपोआपच विजेते ठरणार आहेत. याची आता केवळ २५ आॅगस्टला अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.


काही विजेत्यांची नावं

राजेश साखरे, साजिद आजगावकर, स्मिता नारकर, सुरेश गुरव, कलावती चंदेलिया, बाळकृष्ण चौगुले, तानाजी चव्हाण, हेमंत सुतार, आसाराम शिरसाठ, दिपक पवार, विजय पवार, दादा गायकवाड, विलास सुर्यवंशी, वैभव भटनागर, श्रीकांत तांगरे, अविनाश देशमुख, स्वरूप सोनार, दिपाली जाधव इत्यादी.

लोकप्रतिनिधी गटात २ अर्ज

दरम्यान आजी-माजी लोकप्रतिनिधींसाठी ९०१८ पैकी तब्बल १७२ घर राखीव होती. असं असताना १७२ घरांसाठी केवळ दोनच अर्ज सादर झाले आहेत. त्यामुळं १७० घरं अर्जाविना राहिली असून २ अर्जदार थेट विजेते ठरले आहेत. या नशीबवान विजेत्यांची नाव आहेत सुखदेव काळे आणि अशोक शिंदे.



हेही वाचा - 

बिग बाॅस फेम शर्मिष्ठा ठरणार का म्हाडाची विनर?

गिरणी कामगारांसाठी खूशखबर! आधी अर्जांची छाननी मगच लॉटरी




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा