Advertisement

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींसाठी 'अदानी'ने सुरू केले ८ मदत केंद्र

जेव्हापासून अदानीने ग्राहकांना वीज बिल देयक देण्यास सुरूवात केली. तेव्हापासून अदानीच्या कार्यालयांत वीज बिल वाढीसंदर्भातील तक्रारींचा खच पडू लागला. कारण अदानीने वाढवलेल्या वीज बिलांकडे पाहता, हे देयक ० ते १ टक्के नाही, तर १० ते २० टक्क्यांनी वाढवल्याचा आरोप ग्राहकांकडून होऊ लागला.

वाढत्या वीज बिलांच्या तक्रारींसाठी 'अदानी'ने सुरू केले ८ मदत केंद्र
SHARES

वाढलेल्या वीज बिलांमुळे हैराण झालेल्या मुंबई उपनगरातील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटी (AEML) कंपनीने ८ मदत केंद्र सुरू केली आहेत. या मदत केंद्रावर ग्राहकांना वाढलेल्या वीजदरांसंदर्भात तक्रारी नोंदवता येतील. तसंच ग्राहकांच्या सोईसाठी २४ तास हेल्पलाईन आणि एक इमेल आयडी देखील कंपनीतर्फे सुरू करण्यात आला आहे.


सुधारीत वाढ

अदानी इलेक्ट्रिसिटीने आॅगस्ट महिन्यामध्ये उपनगरातील खासगी वीज वितरण कंपनी रिलायन्स इन्फ्राकडून वीज वितरणाचा कारभार हाती घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र वीज नियामक आयोगा (एमईआरसी) ने सादर केलेल्या सुधारीत वीज दरांनुसार अदानीच्या वीज दरांत ० ते १ टक्के वाढ करण्यात आली.


ग्राहकांच्या तक्रारी

मात्र, जेव्हापासून अदानीने ग्राहकांना वीज बिल देयक देण्यास सुरूवात केली. तेव्हापासून अदानीच्या कार्यालयांत वीज बिल वाढीसंदर्भातील तक्रारींचा खच पडू लागला. कारण अदानीने वाढवलेल्या वीज बिलांकडे पाहता, हे देयक ० ते १ टक्के नाही, तर १० ते २० टक्क्यांनी वाढवल्याचा आरोप ग्राहकांकडून होऊ लागला.


'इथं' नोंदवता येईल तक्रार

दरम्यान, कंपनीच्या प्रवक्ताच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या या सुविधेद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसंच ग्राहक १९१२२ या नंबरवर संपर्क साधून किंवा billsupport.aeml@adani.com या संकेतस्थळावर अापली वीजेबाबतची तक्रार नोंदवू शकतात.हेही वाचा-

मुंबईकरांना दिलासा, बेस्टच्या वीजदरात ६ ते ८ टक्क्यांची घटRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा