Advertisement

मुंबईकरांना दिलासा, बेस्टच्या वीजदरात ६ ते ८ टक्क्यांची घट


मुंबईकरांना दिलासा, बेस्टच्या वीजदरात ६ ते ८ टक्क्यांची घट
SHARES

एेन गणोशोत्सवादरम्यान मुंबईकरांना वीज दरवाढीचा शाॅक लागतो की काय अशी भीती व्यक्त होत होती. मात्र महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं मुंबईकरांवर वीजदरवाढीचा बोजा न टाकता उलट मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसीटीने २०१८-१९ साठीच्या वीजदरांत काही प्रमाणात घट केली आहे. तर टाटा पाॅवरच्या वीजदरात नाममात्र ० ते १ टक्क्यांपर्यंतची दरवाढ झाली आहे.


कसे असतील नवे दर?

बेस्ट आणि अदानीच्या वीजदरात घट झाल्यानं मुंबई शहरातील वीज ग्राहक वीज दरवाढीच्या शाॅकमधून वाचले आहेत. टाटा पाॅवरचे जुने दर प्रति युनिट ९ रू १२ पैसे असे होते, आता हेच दर प्रति युनिट ९ रु. ३८ पैसे असे असणार आहेत. अदानी इलेक्ट्रिसीटीचे जुने दर प्रति युनिट ९ रु. ३७ पैसे होते ते प्रति युनिट ९ रू. ३७ पैशांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. त्याचवेळी बेस्टचे वीजदर प्रति युनिट ८ रु. ६५ पैशांवरून ८ रूपये ०६ पैसे प्रति युनिट असे झाले आहेत.




कृषी क्षेत्राचे वीज दर कसे?

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी मंत्रालयात एका पत्रकार परिषदेत राज्यातील घरगुती, कृषी आणि औद्योगिक विजचे नवे दर जाहीर केले आहेत. तर हे दर १ सप्टेंबर २०१८ पासून लागू झाल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीज दर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रति युनिट असे केले आहेत. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशांवरून ५ रुपये ३१ पैसे तसंच १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रूपये ७४ पैशांवरून ८ रुपये ९५ पैसे प्रति युनिट असे दर करण्यात आल्याचंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं आहे.


ईलेक्ट्रिक वाहनांना अनुदानीत दर

दरम्यान ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठीही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या वीज वापरासाठी अनुदानीत दर ठेवण्यात आले आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग स्टेशनसाठी प्रति युनिट ६ रुपये दर ठरवण्यात आले असून स्थिर आकार (डिमांड चार्जेस) ७० रुपये प्रति केव्हीएम-महिना असा ठरवण्यात आल्याचंही कुलकर्णी यांनी सांगितलं.



हेही वाचा-

बस वेळेत न आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा मोफत पास



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा