Advertisement

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा मोफत पास

एसटीला पेन्शन योजना नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसते. त्यामुळं सुमारे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोफत पास मिळावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडे केली होती. या मागणीला महामंडळाने हिरवा कंदील दिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासोबत त्यांच्या पत्नीलाही पासची सवलत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीचा मोफत पास
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) ने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी बुधवारी दिली. सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या पत्नीला वर्षातील ६ महिन्यांसाठी हा मोफत प्रवास पास मिळणार आहे.


वर्षातून दोनदा मोफत पास

एसटी कर्मचाऱ्यांना सेवेत असेपर्यंत वर्षातून दोनदा मोफत प्रवास पास मिळतो. आई-वडील, पत्नी आणि मूलं यांच्यासह कर्मचारी असा हा मोफत प्रवास पास असतो. सहा महिन्यांतून एकदा कधीही एका महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांत कधीही एका महिन्यांसाठी हा पास वापरता येतो. महामंडळात सध्या १ लाख ४ हजार कर्मचारी असून हे कर्मचारी या योजनेचा लाभ घेतात.


२५ हजार कर्मचाऱ्यांची मागणी

दरवर्षी सुमारे ४ हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. पण सेवानिवृत्तीनंतर मात्र ही पासची सवलत बंद होते. २५ ते ३० वर्षे सेवा दिल्यानंतर निवृत्तीनंतर मात्र या कर्मचाऱ्यांना एसटीने प्रवास करण्यासाठी खिशातून पैसे घालावे लागतात. एसटीला पेन्शन योजना नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नसते. त्यामुळं सुमारे २५ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मोफत पास मिळावा, अशी मागणी एसटी महामंडळाकडे केली होती.

या मागणीला महामंडळाने हिरवा कंदील दिला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासोबत त्यांच्या पत्नीलाही पासची सवलत मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.


सध्या एसटीत ४० हजारांहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. कारण काही शुल्क आकारत प्रवास पास देण्याचा एसटीचा प्रस्ताव होता. अखेर कोणतेही शुल्क न आकारता मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेत महामंडळाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यासाठी एसटी महामंडळ आणि मंत्र्यांचे विशेष आभार.
- श्रीरंग बरगे, सचिव, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसहेही वाचा-

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही मिळणार 'प्रमोशन'

कोकण रेल्वे प्रशासन गणेशोत्सवासाठी सज्ज, २०२ फेऱ्यांचं नियोजनसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा