Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,09,215
Recovered:
47,07,980
Deaths:
79,552
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
37,656
1,657
Maharashtra
5,19,254
39,923

बस वेळेत न आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा


बस वेळेत न आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा
SHARES

बोरीवलीहून खेडला जाणारी शिवशाही बस वेळेत न आल्याने शुक्रवारी सकाळी प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोर जावं लागलं. खेडला जाण्यासाठी वांद्रे येथील टीचर कॉलोनी येथे एसटी पकडण्यासाठी प्रवासी थांबले होते. मात्र एसटी वेळेत न आल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.


ना एसटी आली ना बस

गणेशोत्सवाकरता कोकणात जाण्यासाठी काही प्रवासी वांद्रे येथे थाबले होते. ही एसटी सकाळी ५ वाजता बोरीवलीहून सुटुन ६.१० वाजता वांद्र्याला येणार होती. परंतु, बराच वेळ झाला तरी एसटी न आल्यामुळे एसटीच्या बोरीवली नॅन्सी कॉलोनीकडे प्रवाशांनी विचारणा केली. त्यावेळी समाधानकारक उत्तर न देता एसटी सोडत आहोत, असं प्रवाशांना सांगितलं. काही वेळानंतर पुन्हा प्रवाशांनी चौकशी केली त्यावेळी त्यांना शिवशाही ऐवजी साधी बस सोडत आहोत, असं सांगितले. मात्र, ही बससुद्धा वेळेत न आल्यामुळे वैतागलेल्या प्रवाशांनी कुर्ला डेपोकडे धाव घेतली.


शिवशाही बस बोरीवलीहून सुटण्याची वेळ सकाळी ५ वाजताची होती. ही बस बोरीवलीहुन वाद्र्याला येण्यासाठी १ तास लागतो. परंतु, एक तास झाला तरी बस न आल्यामुळे आम्ही चौकशीसाठी फोन केला. त्यावेळी त्यांनी शिवशाही ऐवजी साधी बस सोडत आहोत, असं सांगितलं.
- रोहन मोरे, प्रवाशी

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा