Advertisement

अमर महल उड्डाणपूल 10 दिवसांत होणार सुरू


अमर महल उड्डाणपूल 10 दिवसांत होणार सुरू
SHARES

दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेला चेंबूर येथील अमर महल उड्डाणपूल येत्या 10 दिवसांत सुरू होणार आहे. हा पूल धोकादायक स्थितीत असल्याने त्याची दुरुस्ती गरजेची होती. दरम्यान हा पूल बंद झाल्याने चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्भवली होती. आता या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं असून येत्या 10 दिवसांत हा पूल जनतेसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.


दुरुस्तीसाठी होता बंद

पूर्व द्रुतगती मार्गावरील चेंबूरमधील अमर महल जंक्शन उड्डाणपुलाच्या मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भागावरील अँगलचं नटबोल्ट निखळलं होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. अमर महल जंक्शन हा महत्त्वाचा उड्डाणपूल असून ठाणे-चेंबूरवरून इस्टर्न फ्री-वे ला जाण्यासाठी हा उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जातो.


पुलाचं बांधकाम कधी झालं?

1992 मध्ये 60 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी वेगळे तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. स्टीलचा वापर करत बांधण्यात आलेला हा पूलही मुंबईतील इतर उड्डाणपुलांप्रमाणेच अल्पावधीतच खराब झाला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा