Advertisement

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातील दर्ग्याची पाहणी करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश

मुंबई पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना पाहणी करण्याचा आदेश दिले आहेत.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम समुद्रातील दर्ग्याची पाहणी करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
SHARES

माहीमच्या समुद्रातील दर्गा हा अनधिकृत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केल्यानंतर आता त्याची दखल मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतली आहे. माहीममधील या दर्गाची पाहणी करण्याचे आणि त्यासंबंधी अहवाल देण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना दिले आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना पाहणी करण्याचा आदेश दिले आहेत. हा दर्गा जर अनधिकृत असेल तर त्याची सविस्तर माहिती मुंबई महापालिका आयुक्तांना देण्यात येईल. त्यानंतर महापालिका आयुक्त यावर कारवाई करतील अशी माहिती आहे.

या दर्ग्यावर एका महिन्यात कारवाई केली नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. त्यानंतर माहीम समुद्रकिनाऱ्यावरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यात एक व्हिडीओ दाखवत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा उभारण्यात आल्याचा आरोप केला होता. हा दर्गा जर हटवला नाही तर त्याच्या बाजूला गणपतीचं सर्वात मोठं मंदिर बांधणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच हा दर्गा हटवावा असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना केलं.

राज ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता राजकीय तसेच प्रशासकीय चक्रे वेगाने हलू लागली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आमदार सदा सरवणकर हे गुरुवारी माहीमच्या समुद्रातील या दर्ग्याची पाहणी करणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी माहीम समुद्र किनाऱ्यावरील बंदोबस्तात वाढ केली आहे.  



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा