Advertisement

महापालिकेत स्थगिती असूनही बायोमेट्रिक हजेरी सुरूच

मुंबई महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून बायोमेट्रिक हजेरी सुरूच ठेवली आहे.

महापालिकेत स्थगिती असूनही बायोमेट्रिक हजेरी सुरूच
SHARES

कोरोना आणि ओमायक्रोनच्या मुंबईतील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व महापालिकांमध्ये ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक हजेरीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून बायोमेट्रिक हजेरी सुरूच ठेवली आहे.

या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिकमुळं कर्मचाऱ्यांना धोका पोहोचू शकतो. त्यामुळं प्रशासनाचा काळ्या फिती लावून निषेध करा, असं आवाहन म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं केलं आहे.

कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट ओसरल्यानंतर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र डिसेंबरअखेरीपासून देशासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोना आणि ओमायक्रोनची संख्या वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर बायोमेट्रिक हजेरी तूर्तास बंद करावी, त्यांना हजेरीपटावर स्वाक्षरी करण्याची परवानगी द्यावी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आणि समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा