अंबोजवाडीतल्या समस्या सोडवण्यासाठी धरणे आंदोलन

 Malad

See all
Malad, Mumbai  -  

मालाड – शौचालय, कचरा, शाळेला नळजोडणी आदी विषय गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे मालवणीतील अंबोजवाडीतल्या रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी सोमवारी वंदेमातरम् संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांनी मालाडच्या पी उत्तर पालिका कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले.

अंबोजवाडीत गेल्या तीन वर्षापूर्वी शौचालये बांधण्यात आली होती. मात्र ते अजूनही नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. येथील शाळांना अर्ज करून सुद्धा स्वतंत्र नळजोडणी मिळाली नाही. कचरा वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यापासून खत बनवणे या प्रकल्पाला सहयोग मिळत नव्हता. त्यामुळे येथे आंदोलनाला बसल्याचे वंदेमातरम संस्थेच्या संस्थापिका मिनाज फिरोज शेख यांनी सांगितले.
या आंदोलनकर्त्यांची पी उत्तर पालिका सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी भेट घेतली. त्यानंतर शौचालयाचे काम उद्यापासून सुरू कऱण्यात येईल तसंच रोज सात कचऱ्याच्या घंटा गाड्या पाठवण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं. या वेळी गुरुकुल हायस्कुलचे सतीश पाटील, फिरोज शेख, भारतमाता हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजचे सुजित राजन, शफाअत इस्लामिक स्कुलचे अकबर उपस्थित होते.

Loading Comments