Advertisement

"या खड्ड्यांना मी जबाबदार"


"या खड्ड्यांना मी जबाबदार"
SHARES

मुंबई - वारंवार तक्रारी करूनही खड्डे न बुजवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्याला बुधवारी सकाळी मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी मनसे स्टाईल दणका दिला.केळकर रोडवरील रस्त्यावर मुख्य अभियंत्याला आरोपीप्रमाणे उभे केले. "मी मुख्य अभियंता (रस्ते) या खड्ड्यांसाठी जबाबदार आहे. याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी", अशी पाटी हातात देत मनसेने मुख्य अभियंत्याला भर रस्त्यात उभे केले. त्यामुळे या हटके आंदोलनाची बुधवारी सर्वत्र चर्चा होती.
 या आंदोलनाबाबत संदीप देळपांडे म्हणाले, "सात दिवसात खड्डे न बुजवल्यास थेट खड्ड्यांमध्ये उभे केले जाईल, असा इशारा गेल्या बुधवारी आम्ही मुख्य अभियंते (रस्ते) यांना यांना दिला होता. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले. मात्र यानंतरही खड्डे न बुजवल्यास त्यांना थेट मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल." तसेच खड्डे बुजवण्यास न अाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देशपांडे यांनी दिला आहे.

आंदोलन देशपांडे आणि धुरींच्या अंगलट?
 मनपा मुख्य अभियंत्याविरोधातील आंदोलन पालिका गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. ज्या मुख्य अभियंत्याला रस्त्यावर उभे करण्यात आले ते मुख्य अभियंता संजय दराडे यांनी देशपांडे आणि धुरी यांच्याविरोधात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपला मानसिक छळ केल्याचे दराडे यांनी या तक्रारीत नमूद केले आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाची पालिका आयुक्त अजोय मेहता यांनीही गंभीर दखल घेतली असून, या दोघांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत विधी खात्याकडून अहवाल मागवला असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा