Advertisement

एएलएममुळे बहरली 2.5 एकरची बाग


एएलएममुळे बहरली 2.5 एकरची बाग
SHARES

पालिका आणि स्थानिकांच्या सहभागातून मुंबईच्या अंधेरी पूर्व विभागातल्या महाकाली परिसरात ओस पडलेल्या 2.5 एकर जागेवरील बाग पुन्हा बहरली आहे. गेल्या 17 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

महाकाली परिसरात महानगरपालिकेचे बरेच भूखंड होते. काही मंडळी या भूखंडाचे श्रीखंड करण्यासाठी महानगरपालिकेकडे पायपीट करत होते पण काही सतर्क नागरिकांनी त्यांचे हे बिंग फोडत एएलएमच्या माध्यमातून तो परिसर निसर्गरम्य केला.

मनपा आणि स्थानिक लोक सहभागातून 2000 साली 'द महाकाली एएलएम कमिटी'ची स्थापना करण्यात आली. या कमिटीच्या माध्यमातून या परिसरातील घनकचरा नष्ट करण्याचे काम करण्यात आले. तसेच जनतेत स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीही करण्यात आली, अशी माहिती द महाकाली एएलएम कमिटीचे सचिव रमेश पै यांनी दिली.

या कालावधीत 'द महाकाली एएलएम'च्या मध्यमातून परिसरात 300 हून अधिक झाडे लावण्यात आली. ज्यामध्ये कॉपर पॉड, कासोदा, इंडियन लॅबर्नम, करंज, बकुळ, ट्रूम्पेट, जंगली आवळा, भेंडी, अननस, फणस, कैलासपती, देव चाफा, बेल, तुळस यांसारख्या वनस्पती येथे लावण्यात आल्या. गेल्या 63 वर्षांपासून एएलएमच्या माध्यमातून दत्तात्रय आचार्य हे या वनस्पतींची देखभाल करत आहेत.

विशेष म्हणजे या बागेसाठी सुक्या कचऱ्यापासून तयार केलेले खत वापरले जाते. या बागेला सर्व वयोगटातील आणि स्तरातील मंडळी भेट देत असतात. या एएलएमच्या माध्यमातून एका खास कार्यशाळेचे देखील आयोजन केल्याची माहिती या विभागातील स्थानिक रहिवासी रमेश खातू यांनी दिली. पालिकेच्या मदतीने निर्माण केलेल्या द महाकाली एएलएम या कमिटीमुळे याचा फायदा मात्र या परिसरातील नागरिकांना नक्कीच होत आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा