Advertisement

आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

देवेंद्र कुमार यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे.

आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती
SHARES

मुंबई (mumbai) उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली (delhi) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी (CJI) नियुक्ती करण्यात आली आहे.

7 जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारला दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराधे यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

 यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला त्यानंतर राष्ट्रपतींनी मंगळवारी मान्यता दिली.

न्यायमूर्ती उपाध्याय यांनी ऑगस्ट 2013 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. उपाध्याय हे मूळचे अलाहाबादचे रहिवासी आहेत. त्यांची नोव्हेंबर 2011 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. नंतर त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश बनवण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाचे (bombay high court) मुख्य न्यायाधीश म्हणून काम करताना, न्यायमूर्ती उपाध्याय यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि राज्यपालांनी नामनिर्देशित केलेल्या 12 आमदारांच्या खटल्यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल दिले.

आलोक आराधे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पूर्णपीठासमोर मराठा आरक्षणावरील सुनावणी सुरू होती, परंतु त्यांच्या बदलीमुळे आता मराठा आरक्षण प्रकरणावर नव्याने सुनावणी होण्याची शक्यता आहे.

न्यायमूर्ती उपाध्याय यांनी मंगळवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमणाबद्दल राज्य (maharashtra) सरकारला फटकारले होते. न्यायमूर्ती आराधे यांची 2009 मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच 2011 मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश बनले होते.

त्यानंतर, 2016 मध्ये त्यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात बदली झाली होती. 2018 मध्ये त्यांनी तीन महिने कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यांनी 17 नोव्हेंबर 2018 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.

2022 मध्ये त्यांनी काही महिने तेथे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले. जुलै 2023 मध्ये त्यांची तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.



हेही वाचा

महाराष्ट्रात इतर राज्यांमधून रक्त घेण्यावरील बंदी उठवली

ST कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस रुग्णालये उभारणार : प्रताप सरनाईक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा