Advertisement

मुंबई BMC च्या निवडणुका 2024 पर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता

सर्वच महापालिका निवडणुका आता 2024 मध्ये ढकलल्या जातील अशी शक्यता आहे.

मुंबई BMC च्या निवडणुका 2024 पर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता
SHARES

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या बीएमसीसह (Mumbai Bmc News) सर्वच महापालिका निवडणुका आता 2024 मध्ये ढकलल्या जातील अशी (bmc polls may be pushed to 2024) शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टात लागलेल्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political News) निकालामुळे उद्धव ठाकरेंकडे सहानुभुतीची लाट असल्याची अटकळ सरकारमध्ये बांधली जातेय. (Mumbai bmc election news)

याशिवाय कर्नाटकमधील काँग्रेसच्या विजयामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वासही वाढलाय. त्यामुळे सत्ताधारींना अनुकुल वातावरण नसल्याचा अंदाज बांधत निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

राज्यात जवळपास 23 महापालिका गेल्या 2 वर्षांपासून प्रशासकाद्वारे चालवल्या जात आहेत. आधी कोविडमुळे आणि नंतर सुप्रीम कोर्टाने ओबीसी राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. 



हेही वाचा

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा