Advertisement

प्रवाशांच्या सेवेसाठी मेट्रो, मोनो सज्ज


प्रवाशांच्या सेवेसाठी मेट्रो, मोनो सज्ज
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक सेवा बंद करण्यात आली. ही वाहतूक सेवा आता हळुहळू पुर्वपदावर येत आहे. परंतु, केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासची मुभा देण्यात आली आहे. सामान्यांना प्रवासासाठी मनाई आहे. मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल मध्य रेल्वे प्रशासनान रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली. तसंच, एसटी, बेस्ट बसही धावत आहे. मात्र आता मेट्रो, तसेच मोनोरेल प्रशासनाने कोरोनापश्चात सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.

प्रवाशांना सुरक्षित वावराचे नियम पाळता यावेत यासाठी स्थानकांत तसंच, प्रवासी डब्यांमध्ये स्टीकर्सच्या माध्यमातून प्रवाशांमध्ये साधारण दीड मीटर अंतर राहील, अशा जागा तयार करण्यात येत आहेत. संचारबंदीत शिथिलता आणल्यानंतर लवकरच या सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. मोनो किंवा मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम आदेश मिळालेला नाही. परंतु, राज्य सरकारनं आदेश दिल्यास कुठल्याही क्षणी सेवा सुरू करण्यास तयार असल्याचे एमएमआरडीए, तसेच मेट्रो १ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

सध्या स्टीकर्स मेट्रो मध्ये लावण्याचं काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना कुठे बसावे/बसू नये हे कळणार आहे. ट्रेनमध्ये चढताना वा उतरताना सुरक्षित वावर राखण्यासाठी ठराविक जागा चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा व सर्व तांत्रिक उपकरणांची देखभालदुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचसोबत मेट्रो, मोनोरेल स्थानकांच्या स्वच्छतेचे, निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही सेवांमधून जवळपास साडेपाच लाख नागरिक नियमित प्रवास करतात.

मुंबईत बुधवारपासून पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीच दोन्ही यंत्रणांकडून मान्सूनपूर्व कामांनी वेग घेतला आहे. मोनोच्या १९.६४ किमी उन्नत मार्गाला पावसाळ्यात धोका संभवू शकतो, अशा झाडांची छाटणी करण्यात आली आहे. मान्सूनच्या दृष्टीने सशक्य तितक्या उपाययोजना केल्या जात आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा