Advertisement

अॅमेझॉन फक्त आवश्यक सामानांची डिलिव्हरी करणार

आवश्यक सामानांची डिलिव्हरी केली जाणार असल्याचं ई-कॉमर्स साइट अॅमेझॉननं म्हटलं आहे.

अॅमेझॉन फक्त आवश्यक सामानांची डिलिव्हरी करणार
SHARES

देशातील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन(Amazon) ने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना (corona) महामारीच्या काळात काही शहरात फक्त आवश्यक सामानांची (essentials) डिलिव्हरी केली जाणार असल्याचं ई-कॉमर्स (E Commerce) साइट अॅमेझॉननं म्हटलं आहे.

बीजीआरच्या रिपोर्टनुसार, यासाठी एक मोठा बॅनर अॅमेझॉनची वेबसाइटवर Amazon.in वर लावण्यात आला आहे. या बॅनरवर फक्त आवश्यक सामानांची डिलpव्हरी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. अॅमेझॉनच्या अधिकृत निवेदनानुसार, सरकारच्या गाइडलाइन्सला फॉलो करण्यासाठी अॅमेझॉननं हा निर्णय घेतला आहे.

केवळ आवश्यक सामानांची डिलिव्हरी अॅमेझॉन करीत आहे, याला डिलिव्हरी करण्यासाठी नॉर्मलपेक्षा जास्त टाइम लागत आहे. अॅमेझॉन (Amazon) च्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे की, आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन करीत आहोत. जर एखाद्या ठिकाणी लॉकडाऊन आहे. त्या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलं की, आवश्यक सामानांची डिलीव्हरी करा.

हँडवॉश, सॅनिटायजर, डिसइन्फेक्ट, ग्रॉसरी, ग्रुमिंग इसेंशियल, स्कीन अँड हेयर केयर, पर्सनल केयर, हेल्थ फिटनेस, बेबी केयर अँड सप्लाय, क्लिनिंग अँड हाउस सप्लाय आदींचा आवश्यक सामानांच्या यादीत समावेश आहे.

दरम्यान कोरोनाविरोधातील लढाईत अॅमेझॉन देखील मदतीसाठी पुढे आले आहे. अॅमेझॉनने मदत करण्यासाठी ACT Grants, Temasek Foundation आणि Pune Platform सोबत भागिदारी केली आहे.

यासाठी अॅमेझॉन ८००० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आणि 500 BiPAP मशीनला एअरलिफ्ट करणार आहे. त्याचबरोबर अॅमेझॉनकडून १५०० ऑक्सिजन कंन्सेट्रेटर आवश्यक हॉस्पिटलमध्ये दिले जाणार आहेत.हेही वाचा

उशीरा शहाणपण! मुंबई महानगरातील सर्व रुग्णालयांच्या फायर आॅडिटचे निर्देश

मुंब्रा येथील प्राइम हॉस्पिटलला आग; ४ रुग्णांचा मृत्यू

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा