तातडीने अॅम्ब्युलन्स हवी आहे? मग हे अॅप डाऊनलोड करा!

  Mumbai
  तातडीने अॅम्ब्युलन्स हवी आहे? मग हे अॅप डाऊनलोड करा!
  मुंबई  -  

  आता तुम्हाला मोबाईलच्या एका क्लिकवर अॅम्ब्युलन्सची सेवा मिळू शकणार आहे. ‘अॅम्ब्युलन्स डॉट रन’ या अॅपच्या माध्यमातून सामान्यांना ही सेवा मिळणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत योग्य वापर करण्यासाठी तरुणाई आता प्रयत्न करत आहे. त्यातूनच हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला आहे.

  या अॅपच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलच्या साहाय्याने कमी वेळात नजीकच्या परिसरातील रुग्णवाहिका गरजू रुग्णांच्या सेवेत सहज उपलब्ध होणार आहे. सध्या ही सेवा मुंबई, पुणे आणि ठाण्यात सुरू करण्यात आली आहे.


  हेही वाचा

  मोबाईल अॅपच्या माध्यमातून मिळणार रुग्णालयांची माहिती


  या अॅपच्या माध्यमातून बुकिंग करताना त्या व्यक्तीची स्थळनिश्चिती अॅपमध्येच अंतर्भूत होईल. त्यानंतर बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. या अॅपला 360 हून अधिक रुग्णवाहिका आणि 250 हून अधिक रुग्णवाहिकांचे ऑपरेटर्स जोडण्यात आले आहेत, अशी माहिती 'अॅम्ब्युलन्स डॉट रन'चे संचालक हेमंत ठाकरे यांनी दिली. अॅम्ब्युलन्सच्या या सेवेची सुरुवात नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

  बऱ्याचदा आपल्या येथील अॅम्ब्युलन्सची सेवा पुरवण्यात काही त्रुटी आढळतात. त्या त्रुटी भरून काढण्यासाठी आणि सामान्यांना अॅम्ब्युलन्सची सेवा तातडीने आणि सहज उपलब्ध करून देण्यासाठी या अॅपची निर्मिती करण्यात आली असून भविष्यात या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

  - हेमंत ठाकरे, संचालक, अॅम्ब्युलन्स डॉट रन

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.