मोबाईल अॅपच्या माध्यमातून मिळणार रुग्णालयांची माहिती

 Mumbai
मोबाईल अॅपच्या माध्यमातून मिळणार रुग्णालयांची माहिती

मुंबई - सरकारी आणि खासगी रुग्णालयात सद्यस्थितीत उपलब्ध असलेले बेड, त्या रुग्णालयात आयसीयू आहे की नाही? संबंधित रुग्णालयात आकारण्यात येणारी फी यासारखी परिपूर्ण माहिती देणारा अ‍ॅप लवकरच मुंबईकरांच्या सेवेला दाखल होणार आहे.

मानखुर्दच्या दामोदर अपंग स्वाभिमान संस्था आणि असेंट फ्युचरटेक प्रा.लि. कंपनीतर्फे हे अ‍ॅप बनवण्यात आले असून गुगल प्ले स्टोअरवर ते मोफत डाऊनलोड करता येणार आहे. या अॅपवर क्लिक केल्यास तुमच्या जवळपास असलेल्या रुग्णवाहिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयांचे अंतर त्याचप्रमाणे त्या रुग्णालयात सद्यस्थितीत उपलब्ध असलेली बेडची संख्या, त्याचप्रमाणे त्या रुग्णालयात आकारली जाणारी फी, ज्या रुग्णालयाच्या नावावर तुम्ही क्लिक केलात, त्यावेळी तत्काळ त्या रुग्णालयात मॅसेज जाणार आणि तुमच्या आपातकालीन परिस्थितीनुसार तुम्ही रुग्णालयात जाण्यापूर्वी तुमच्या वैद्यकीय सेवेसाठी ते सुसज्य राहणार. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून सर्व सुविधांयुक्त डॉक्टर उपलब्ध असलेली रुग्णवाहिका मिळवता येणार आहे.

Loading Comments