Advertisement

यापुढे देशात अॅबॉटचे डिझॉल्व्हिंग स्टेण्ट मिळणार नाहीत!


यापुढे देशात अॅबॉटचे डिझॉल्व्हिंग स्टेण्ट मिळणार नाहीत!
SHARES

स्टेण्ट उत्पादन आणि विक्री क्षेत्रातील आघाडीच्या अशा अमेरिकेतील अॅबॉट कंपनीला डिझॉल्व्हिंग स्टेण्टची उत्पादन-विक्री बंद करण्यास अखेर राष्ट्रीय औषध दरनियामक प्राधिकरण (एनपीपीए)ने गुरूवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे आता यापुढे देशात अॅबॉटचे डिझॉल्व्हिंग स्टेण्ट उपलब्ध होणार नाहीत. स्टेण्टच्या नावाखाली होणारी रूग्णांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सात महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने किंमती नियंत्रणात आणल्या. त्यामुळे भारतात स्टेण्टचे उत्पादन आणि विक्री करणे परवडणारे नसल्याचे म्हणत अॅबॉटने यासंबंधीची परवानगी एनपीपीएकडे मागितली होती.

स्टेण्टच्या नावावर कंपन्या, रूग्णालय आणि डॉक्टर रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याच्या मोठ्या तक्रारी होत्या. 25 ते 30 हजार मूळ किंमत असलेले स्टेण्ट कंपन्या-रुग्णालय-डॉक्टरांकडून चक्क 70 हजार ते अडीच लाखांमध्ये विकले जात होते. त्यामुळे कंपन्या-रुग्णालय आणि डॉक्टरांना चाप बसवा आणि रुग्णांची आर्थिक लूट थांबावी यासाठी स्टेण्टच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी होत होती. त्यानुसार 14 फेब्रुवारी 2017 रोजी एनपीपीएने स्टेण्टच्या किंमती 85 टक्क्यांनी कमी करत 30 हजार अशी विक्री किंमत निश्चित केली. आता या किंमतीनेच स्टेण्टची विक्री कंपन्यांसह रुग्णालयांना करणे बंधनकारक आहे.


जगभरात उत्पादन-विक्री बंद...

भारतात किंमती नियंत्रित झाल्याने अॅबॉटने भारतात उत्पादन-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनपीपीएकडे परवानगी मागितली. मुळात अॅबॉटच्या एकूण स्टेण्ट विक्रीपैकी 95 टक्के विक्री ही भारतात होते. त्यामुळे किंमत नियंत्रणाचा फटका अॅबॉटला बसत आहे आणि म्हणूनच ही परवानगी मिळावी यासाठी अॅबॉटने जगभरातील डिझॉल्व्हिंग स्टेण्टची विक्री-उत्पादन बंद करण्याचे ठरवले.

डिझॉल्व्हिंग स्टेण्टमध्ये काही त्रुटी असल्याने, स्टेण्टची जाडी जास्त असल्याने जाडी कमी करत त्रुटी दूर करत नव्याने हा स्टेण्ट बाजारात आणण्यात येणार असल्याचे अॅबॉटने स्पष्ट केले आहे. मात्र, नवे स्टेण्ट भारत वगळता जगभरात विकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे यापुढे अॅबॉटचे स्टेण्ट भारतात उपलब्धच होणार नाहीत.


रूग्णांना फटका

अॅबॉटचे डिझॉल्व्हिंग स्टेण्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत तयार करण्यात येते. तर हे स्टेण्ट परिणामकारक असून तरूण रुग्णांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. असे असताना आता हे स्टेण्ट बंद झाल्याने रुग्णांना त्याचा फटका बसणार असल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी दिली आहे. तर आता भारतीय स्टेण्ट कंपन्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत परिणामकारक स्टेण्ट तयार करण्याची गरज असल्याचेही मत डॉ. सुरासे यांनी व्यक्त केले आहे.


स्टेण्ट म्हणजे काय?

स्टेण्ट हे एक वैद्यकीय उपकरण आहे. अॅन्जिओप्लास्टी करताना रक्तवाहिन्यांमध्ये हे उपकरण टाकले जाते. जेणेकरून रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होईल.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा