Advertisement

'सही दाम'नेच खरेदी करा औषधे!


'सही दाम'नेच खरेदी करा औषधे!
SHARES

देशभरात 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू झाली असली, तरी अजूनही सर्वसामान्यांना या करप्रणालीची म्हणावी तशी माहिती झालेली नाही. औषधांवरही जीएसटी लागू असल्याने ग्राहकांची लूट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ग्राहकांना योग्य दरांत औषधे उपलब्ध व्हावीत, म्हणून नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अॅथाॅरिटी (एनपीपीए)ने 814 औषधांच्या किंमती निश्चित केल्या अाहेत. शिवाय याच किंमतीत औषधांची विक्री करणे कंपन्यांसह औषध विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे.

या 814 औषधांच्या योग्य किंमती ग्राहकांना कशा कळतील? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे. पण काळजी करायचे कारण नाही, कारण 'एनपीपीए'ने 'फार्मा सही दाम' नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन बनवले असून अवघ्या एका क्लिकवर ग्राहकांना या औषधांची मूळ किंमत समजणार आहे.


थोडे थांबवे लागणार

जीएसटीच्या धर्तीवर ठरवण्यात आलेल्या 814 औषधांच्या किमती अॅपमध्ये समाविष्ट करण्याचे काम 'एनपीपीए'कडून जोरात सुरू आहे. त्यानुसार येत्या चार-पाच दिवसांत या किमती अॅपवर उपलब्ध होतील, अशी माहिती 'मुंबई लाइव्ह'ला 'एनपीपीए'कडून देण्यात आली आहे. शिवाय ज्या ग्राहकांना या 814 औषधांच्या किमती आत्ताच जाणून घ्यायच्या आहेत, त्यांच्यासाठी 'एनपीपीए'च्या संकेतस्थळावर या औषधांची यादी टाकण्यात आली आहे.


महत्त्वाच्या औषधांचा समावेश

एड्स, कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, अॅण्टीबायोटिक, व्हीटामिन अशा महत्त्वाच्या औषधांच्या किंमती जीएसटी लागू झाल्यानंतरही वाढणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घेत 'एनपीपीए'ने 814 औषधांच्या किमती निश्चित केल्या आहेत. याच किंमतीत ही औषधे विकली जात आहेत की नाही, यावर 'फार्मा सही दाम' अॅपच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे.


असे पाहा अॅप

'एनपीपीए'चे फार्मा अॅप डाऊनलोड केल्यानंतर औषधाचे ब्रॅण्डनेम वा जेनेरीक नेम टाईप केल्याबरोबर त्या घटकाच्या औषधांची यादी येते. त्या यादीनुसार आपल्याला कोणते टॅब्लेट, सिरप वा इंजेक्शन हवे, ते क्लिक केल्यास त्या औषधाच्या मूळ किंमतीसह इतर माहिती येते.


तक्रारही करता येणार

या अॅपद्वारे तुम्हाला केवळ औषधाची मूळ किंमतच समजणार नाही, तर तुमची फसवणूक वा लूट झाली असेल तर तुम्हाला घरबसल्या तक्रारही करता येणार आहे. औषध कुठून कधी खरेदी केले यासह औषधाची माहिती आणि औषध कंपनीची माहिती तक्रारीत नमूद केली की 'एनपीपीए' या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करणार आहे.


'फार्मा सही दाम' हे मोबाईल अॅप ग्राहक आणि रुग्णांच्या खूपच फायद्याचे आहे. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर महागड्या दरात औषधांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने या अॅपद्वारे औषधाची योग्य, मूळ किंमत तपासूनच औषधं खरेदी करावीत. आपली फसवणूक, लूट होत असेल तर 'एनपीपीए'कडे तक्रार करता येईल. सोबतच 'एफडीएकडे'ही तुम्ही तक्रार करु शकता. 'एफडीए' निश्चित तुमच्या तक्रारीनुसार चौकशी करत कंपन्या आणि औषध विक्रेत्यांविरोधात कारवाई करेल.


- विनिता थाॅमस, सहआयुक्त (औषध) बृहन्मुंबई, एफडीए


येथे करा तक्रारी  

9695736333 व्हाॅट्सअॅप नंबर
1800111255 हेल्पलाइन नंबर


हे आहे संकेतस्थळ

http://www.nppaindia.nic.in



हे देखील वाचा -

जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा