Advertisement

जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !


जीएसटी आला, पण 761 औषधांवर फारसा परिणाम नाही !
SHARES

देशभर 1 जुलैपासून जीएसटी करप्रणाली लागू होणार असून जीवनावश्यक औषधांचीही सुटका जीएसटीतून झालेली नाही. जीएसटी लागू झाल्याने औषधांच्या किंमती वाढणार आहेत. औषधांच्या किंमती भरमसाठ वाढू नयेत आणि त्याचा रुग्णांना फटका बसू नये यासाठी अखेर राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण अर्थात 'एनपीपीए'पुढे सरसावले आहे. 'एनपीपीए'ने मंगळवारी 761 औषधांच्या किंमती जाहीर केल्या आहेत. या किंमती काही प्रमाणात कमी करत रुग्णांना दिलासा देण्यात आला आहे. जेणेकरुन 12 टक्के जीएसटी लागू झाला तरी, औषधांच्या किंमती भरमसाठ वाढणार नाहीत याची पूर्ण काळजी 'एनपीपीए'ने घेतली आहे. त्यामुळे 'एनपीपीए'च्या या निर्णयाचे आरोग्य चळवळीतून स्वागत केले जात आहे.

761 औषधांच्या किंमतीची यादी जाहीर

औषधे ही जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत असल्याने औषधांवर जीएसटी लावू नये अशी मागणी सर्वच स्तरातून उचलून धरण्यात आली होती. मात्र अखेर केंद्र सरकारने या मागणीकडे काणाडोळा केल्याने जीवनावश्यक अशा औषधांवरही 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. साहजिकच 12 टक्के जीएसटी लागू झाल्याने औषधांच्या किंमती वाढणार असून त्याचा फटका कर्करोग, हृदयरोग, मधुमेह, एचआयव्हीबाधित रूग्णांसह अन्य रुग्णांनाही बसणार आहे. ही बाब लक्षात घेत एनपीपीएने 27 जून रोजी 761 औषधांच्या किंमतींची यादी जाहीर केली आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतरही औषधांच्या किंमती 12 टक्क्यांनी नव्हे तर, 2 ते 3 टक्क्यांनीच वाढतील याची काळजी घेत 761 औषधांच्या किमती एनपीपीएन जाहीर केल्या आहेत. एनपीपीएचा हा निर्णय अगदी योग्य आणि स्वागतार्ह असल्याचे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्ते यजुर्वेदी राव यांनी यामुळे निश्चितच रुग्णांना दिलासा मिळेल, असे स्पष्ट केेले आहे. 

दरम्यान, 29 जुलैपर्यंत अर्थात दोन दिवसात या किंमतींबाबतच्या हरकती नोंदवण्यासाठी औषध कंपन्यांना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे 29 जुलैनंतर किंमतीमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता असून 1 जुलैपासून जीएसटीसह या औषधांच्या अंतिम किंमती लागू होतील, असेही 'एनपीपीए'कडून स्पष्ट करण्यात आले आहे.


कर्करोग, एचआयव्हीबाधित, मधुमेहींना दिलासा

एनपीपीएकडून जाहीर करण्यात आलेल्या 761 औषधांच्या यादीत कर्करोग, हृहयरोग, एचआयव्ही, मधुमेह यांसारख्या दुर्धर आजारांवरील औषधांचा समावेश आहे. तर, अन्य असाध्य आजारांवरील औषधेेही यात समाविष्ट आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या आणि दुर्धर आजारांवरील औषधांचा समावेश नव्या यादीत करत अशा रुग्णांना दिलासा देण्याचे काम एनपीपीएने केले आहे.



हे देखील वाचा - 

जनऔषधी केंद्रांना अच्छे दिन!

यापुढे खा प्युअर व्हेज औषधं!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा