Dadar
  जीएसटीमुळे सर्व व्यवहार कायदेशीर होतील - साबळे

  जीएसटीमुळे सर्व व्यवहार कायदेशीर होतील - साबळे

  Share
  Now
  मुंबई  -  

  मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळ आणि क्षात्रऐक्य समाज दादर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वस्तू व सेवाकर (जीएसटी) ची माहिती सर्वांना व्हावी, यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. 1 जूलैपासून राज्यात लागू होणाऱ्या जीएसटी कर प्रणालीबाबतची माहिती आणि त्याचे व्यावसायिक वैयक्तिक जीवनात होणारे छोटेमोठे परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सी.ए. मुकुंद साबळे यांनी यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

  जीएसटीमुळे आता सर्वच व्यावसायिकांना आपल्याकडे असलेल्या मालाचे बिल ठेवावे लागणार आहे. आता एकच टॅक्स असणार आहे. पूर्वीसारखे वेगवेगळे टॅक्स तुम्हाला भरावे लागणार नाहीत. त्याचबरोबर सर्व प्रणाली आता कम्प्यूटरवर असल्यामुळे सर्व कायदेशीर असणार आहे. त्याचसोबत सर्व व्यवहार हे ऑनलाईन असणार आहेत. यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नसल्यामुळे टॅक्स कमी लागणार आहे. विशेष म्हणजे तुमचा सर्व डेटा सरकारकडे असणार आहे. तुम्ही जे काही व्यवहार करता त्याचा डेटा जो सरकारकडे आहे त्या बेसवर तुमच्याशी कोण व्यावसायिक डील करणार की नाही हे ठरवणे सोपे जाणार आहे, अशी माहिती साबळे यांनी यावेळी दिली.


  हेही वाचा

  असा होईल ‘जीएसटी’चा घरखर्चावर परिणाम

  जीएसटीमुळे पाच वर्षांत महापालिका तोट्यात?


  प्रत्येक व्यावसायिकाला वस्तूंची सुसंगत विभागणी करावी लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करणे देखील सुलभ होईल. संगणक आणि जीएसटीची माहिती असणारा कुणीही हे व्यवहार मेंटेन ठेवू शकेल. कुणालाही विशेष सीए ठेवलाच पाहिजे असे काही नाही. व्यवसाय हा नेहमीच कमी पैशात आणि मोठ्या व्यवसायिकांशी करणे फायद्याचे असते. त्यामुळे व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, तुम्ही सरकारकडे रजिस्टर करा, असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले. 

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.