Advertisement

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंगाल टायगर 'आनंद'चा कॅन्सरनं मृत्यू


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बंगाल टायगर 'आनंद'चा कॅन्सरनं मृत्यू
SHARES

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'आनंद' वाघाचे गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. आनंद हा वाघ ३ महिने कॅन्सर आणि मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता. ३ महीने आजाराशी लढा देताना अखेर गुरुवारी आनंदचा मृत्यू झाला. सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंद हा रॉयल बंगाल टायगर प्रजातीचा वाघ आहे.

आनंद या वाघाचा २०१० मध्ये उद्यानात जन्म झाला होता. उद्यानातील 'बसंती' आणि 'पलाश' या वाघांच्या जोडीपासून तो जन्मला होता. आनंद हा वाघ पर्यटकांप्रमाणेच इथल्या कर्मचाऱ्यांचाही लाडका होता. आक्रमक वृत्ती नसलेल्या आनंदच्या जाण्याने उद्यानातील वाघांच्या संख्येतही घट झाली आहे.

३ महिन्यांपासून आनंद आजारी पडला होता. मूत्रपिंड विकारासह स्नायूंच्या कॅन्सरनं आनंद त्रस्त होता. मागच्या आठवड्यापासून त्याची प्रकृती अधिकच ढासळत गेली. त्यास जडलेला कॅन्सर हा दुर्मीळ प्रकारचा होता. त्याच्यावर उपचारांसाठी उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आणि त्यांच्या चमूने प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

आनंदला योग्य उपचार मिळावेत म्हणून मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ, प्राध्यापकांसह अन्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचेही साहाय्य घेण्यात आले. कोरोनाचा प्रार्दूर्भाव वाढत असतानाही आनंदच्या उपचारांत कोणताही खंड पडला नव्हता. परंतु, अखेर त्याचा मृत्यू झाला.हेही वाचा - 

मास्क न लावताच घराबाहेर पडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ६४ हजार कोरोना चाचण्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा