मुलुंडकरांमध्ये बिबट्याची दहशत

मुलुंड - गेल्या दहा दिवसांत एकाच सोसायटीत दोनदा बिबट्याला बघून मुलुंडकरांमध्ये घबराट पसरली आहे. इथल्या रहिवाशांनी या बिबट्याला तात्काळ पकडण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.

31 जानेवारीला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या मुलुंडमधील लोकवस्ती असलेल्या पार्किंगच्या जागेत फिरत असल्याचं रहिवाशांनी पाहिलं. यापूर्वी 21 जानेवारीला बिबट्या त्याच ठिकाणी फिरत असल्याचं रहिवाशांनी पाहिलं. दहा दिवसांत दोनदा बिबट्याला बघून इथल्या रहिवाशांनी विनविभागाला लेखी तक्रार केली आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्या लवकरात लवकर पकडला जावा असं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे.

Loading Comments