Advertisement

अंधेरीतील D मार्टकडून COVID 19 नियमांचं उल्लंघन, पालिकेनं केली 'ही' कारवाई

पालिकेनं D मार्टवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचं उघड झालं आहे.

अंधेरीतील D मार्टकडून COVID 19 नियमांचं उल्लंघन, पालिकेनं केली 'ही' कारवाई
File Image
SHARES

मुंबईच्या अंधेरी पूर्व इथल्या D-मार्ट स्टोअर सिल करण्यात आले आहे. D मार्टनं COVID 19 प्रोटोकॉल संदर्भातील अनेक नियम मोडल्याचं आढळलं. त्यामुळेच पालिकेनं D मार्टवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई केल्याचं उघड झालं आहे.  

वृत्तानुसार, २५ मार्च गुरुवारी डी-मार्ट स्टोअरवर के ईस्ट एएमसी प्रशांत सपकाळे यांनी सिल लावला. महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी हे सुपरमार्केट कोरोनव्हायरसचा सुपर-स्प्रेडर्स ठरण्याची शक्यता वर्तवली. म्हणून त्यांनी स्टोअरला सील करण्याचे आदेश दिले.

शिवाय, COVID 19 च्या दुसर्‍या लहरी दरम्यान महाराष्ट्र शासनानं जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाच्या शेवटपर्यंत स्टोअर सीलबंद करण्यात येणार आहे. यापूर्वी, कल्याण-डोंबिवलीतील डी-मार्टचे स्टोअर देखील सिल करण्यात आले होते. मार्टमधील ५ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असतानाही काम करताना आढळले होते.

अहवालानुसार, येत्या काळात D मार्टमध्ये तपासणी केली जाईल. जर यामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचं आढळलं तर कोरोना जाईपर्यंत D मार्ट बंद ठेवण्यात येईल.

दुसरीकडे, देशांतर्गत उड्डाणात COVID 19  मानदंडांचं उल्लंघन करणाऱ्या १५ प्रवाशांना वाहकांकडून तीन महिन्यांसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. हा नियम संपूर्ण देशभरात लागू होऊ शकतो.



हेही वाचा

ड्रीम्स माॅल आग: दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबईत दोन मेट्रोमुळे दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा