Advertisement

मुंबईत दोन मेट्रोमुळे दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार

मुंबईतील दोन मेट्रो लाइन्समुळे तब्बल दहा लाखांंपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष नोंदवला आहे.

मुंबईत दोन मेट्रोमुळे दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार
SHARES

कोरोना लाॅकडाऊनमुळे देशातील लाखो नागरीक बेरोजगार झाले आहेत. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील दोन मेट्रो लाइन्समुळे तब्बल दहा लाखांंपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेने केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष नोंदवला आहे. 

मुंबईत सुरू होणाऱ्या २ ए दहिसर-डीएन नगर आणि ७ दहिसर ईस्ट-अंधेरी या दोन मेट्रो लाईन्समुळे शहरात १० लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहे. या सर्वेक्षणानुसार, २ ए आणि ७ या दोन्ही मेट्रो लाईन्समधील एक किलोमीटर अंतराच्या बफर झोनमधील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या क्षेत्रात जवळपास १४ लाख रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे. 

तर मेट्रो-१ आणि पश्चिम उपनगर रेल्वे जाळ्यात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात जवळपास २६ हजार रोजगार उपलब्ध आहेत. २ ए लाईनवर प्रती चौरस किलोमीटरवर हे प्रमाण १० हजार ५०० तर ७ क्रमांकांच्या लाईनवर २० हजार ७०० इतकं आहे. या दोन मेट्रो लाईन्सच्या तुलनेत मेट्रो एक आणि पश्चिम उपनगर रेल्वे मार्गावर रोजगार कमी असणार आहे. सध्या ११.५ किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन १ कार्यरत आहे. यंदा मेट्रो लाइन २ ए आणि ७ कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटरचे संचालक माधव पै म्हणाले की, ‘जलद दळणवळणाची सुविधा देणाऱ्या या पायाभूत सुविधांच्या विकासामुळं मुंबईत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता निर्माण होत असल्याचं या अभ्यासातून दिसत आहे. मेट्रो स्टेशनच्या आजूबाजूच्या परिसरात चांगले रस्ते, वाहतूक व्यवस्था, घरं, सांस्कृतिक संस्था आदी सुख सुविधा विकसित करण्यावर भर देणं गरजेचं आहे. सरकारनं अगदी अतिदूरच्या परिसरापर्यंतदेखील वाहतूक व्यवस्था, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्वसमावेशक तिकिट व्यवस्था तसंच रेल्वे स्थानकांजवळ सुंदर सार्वजनिक ठिकाणं निर्माण करण्याकडं लक्ष दिलं पाहिजे.



हेही वाचा - 

सनराईस रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा