Advertisement

ड्रीम्स माॅल आग: दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भांडुपमधील ड्रीम्स माॅलला लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत या आगीसंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

ड्रीम्स माॅल आग: दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
SHARES

भांडुपमधील ड्रीम्स माॅलला लागलेली आग अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत या आगीसंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या माॅलमधील आगीत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

ड्रीम्स मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली. तसंच राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरु आहेत, अशा ठिकाणी अग्नीसुरक्षेची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

हेही वाचा- सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

ड्रीम्स माॅलमध्ये कोविड रुग्णालय कसं उभं राहिलं, याविषयी प्रश्न उपस्थित केले जात असताना उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी माहिती दिली. ते म्हणाले की, वाढत्या कोविड संसर्गामुळे विविध इमारती किंवा वास्तूंमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अशा प्रकारच्या फिल्ड रुग्णालयांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. आजच्या आगग्रस्त रुग्णालयास देखील तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. 

याआधी मी भंडारा येथील जिल्हा रुग्णालय आगीनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची तपासणी करून घेण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे कोविड उपचारासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातील सर्व फिल्ड रुग्णालये व  इमारतींमधील रुग्णालयांच्या अग्नी सुरक्षेची खातरजमा करून घेण्यात यावी, असे निर्देश मी देत आहे. या दुर्घटनेतील जखमी तसंच कोविड रुग्णांना इतरत्र उपचार मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल, असंही ते म्हणाले. 

(CM Uddhav Thackeray visited the premises of Sunrise Hospital after Bhandup Dream Mall fire incident)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा