रस्त्यावर धमाल

 Andheri
रस्त्यावर धमाल
रस्त्यावर धमाल
रस्त्यावर धमाल
See all

अंधेरी - आठवड्याचे सातही दिवस वाहनांच्या गर्दीमुळे मुंबईकरांना साधा मोकळा श्वास घेणंही अवघड झालंय. मात्र अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोडवर मात्र रविवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत रस्त्यावर चक्क खेळ, योगा, संगीत, नृत्य, कला यांची धम्माल बघायला मिळाली. निमित्त होतं बी हॅप्पी फाऊण्डेशनने आयोजित केलेल्या बी हॅप्पी रस्ता महोत्सवाचं. या रस्त्यावर सायकलिंग, स्केटिंग, एरोबिक्स, योग, संगीत, फ्लॅशमाॅब, सालसा नृत्य, चित्रकला, क्रिकेट, बॅडमिंटन, खाद्यपदार्थ अशा विविध उपक्रम आणि स्पर्धांमध्ये या रस्ता महोत्सवात लोखंडवाला तसंच ओशिवरा, सात बंगला आणि चार बंगला परिसरातील तरुण-तरुणी मोठ्या उत्साहाने हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते. दरम्यान लोखंडवाला येथील न्यू म्हाडा टाॅवर ते गणपती विसर्जन रोड या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजक आणि बी हॅप्पी फाऊण्डेशनच्या विश्वस्त शालिनी ठाकरे, प्रशांत राणे, सुरजीत ददालिया, संदेश देसाई आणि इतर कार्यकर्त्यांचा यामध्ये सहभाग होता.

Loading Comments