'आम्ही मतदान करणार नाही'

सीएसटी - गेल्या 10 वर्षांपासून पूनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अंधेरीतील संदेशनगर आणि क्रांतीनगरमधील झोपडपट्टीवासी आझाद मैदानात बेमुदत उपोषणा बसले आहेत. जवळपास 4 हजार झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पुनर्वसनाचा प्रश्न न सुटल्यास महपालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय या झोपडपट्टीवासीयांना घेतला आहे.

संदेशनगर, क्रांतीनगरमधल्या 4 हजार झोपडपटट्या 60 वर्षे जुन्या आहेत. झोपडपट्टीवासी इथे अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांना एमयुटीपी कायद्यांतर्गत घर देण्याच्या मागणीसाठी इथल्या रहिवाशांनी बेमुदत उपोषणाचा बडगा उचलला आहे.

Loading Comments