अंगणवाडी सेविकांनी केली अर्थसंकल्पाची होळी

 Chembur
अंगणवाडी सेविकांनी केली अर्थसंकल्पाची होळी
अंगणवाडी सेविकांनी केली अर्थसंकल्पाची होळी
See all

चेंबूर - अंगणवाडी सेविकांनी बुधवारी सरकारच्या विरोधात चेंबूर अंगणवाडी प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी कुठलीच तरतूद केली नाही. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. तसेच संतापलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अर्थसंकल्पाची होळी केली.

दर तीन वर्षांनी करण्यात येणारी मानधान वाढ 2014 पासून करण्यात आली नाही. त्यामुळे मानधनात वाढ करावी, सेविका आणि मदतनीस यांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या.

Loading Comments