पालिकेत 900 कोटींचा कचरा घोटाळा

  Share
  Now
  मुंबई  -  

  मुंबई - यंदाचं वर्ष पालिकेतील नालेसफाई, रस्ते घोटाळ्याने गाजतानाच आता एन, एस आणि टी, वॉर्डमधील कचऱ्याची वाहतूक करताना 900 कोटींच्या कामांत घोटाळा झाला असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी गुरुवारी स्थायी समितीत केलाय. या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. या आरोपाबाबत प्रशासनाकडून येत्या स्थायी समितीत खुलासा केला जाणार आहे.

  जीपीएस आणि व्हीटीएस ( व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम) च्या नोंदी तपासून कंत्राटदारांना बिल मंजूर करून देण्याचे आदेश असतानाही अभियंत्यांनी खोट्या नोंदी करून कामांच्या वेळा, मार्ग, काम समाप्तीची वेळ यात फेरफार केल्याचं देशपांडे यांनी म्हटलंय. तर याबाबत माहिती घेऊन येत्या स्थायी समिती सभेत खुलासा केला जाईल, असं अतिरिक्त आयुक्त पल्लवी दरा़डे यांनी सांगितलं.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.