Advertisement

मुलुंडमध्ये मृत अवस्थेत आढळली हरिणी


मुलुंडमध्ये मृत अवस्थेत आढळली हरिणी
SHARES

मुलुंड पश्चिम येथील शंकर टेकडी अमरनगर येथे शनिवारी सकाळी एक जखमी अवस्थेत हरिणी असल्याची माहिती पशु कल्याण अधिकारी सुनीश कुंजू यांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. मात्र ती हरिणी मृत अवस्थेत होती. विशेष म्हणजे या हरिणीला वाचवण्यासाठी आधीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बचाव पथकही घटनास्थळी दाखल झालं होतं.मात्र त्या आधीच या हरिणीचा मृत्यू झाल्याने हरिणीला वाचवण्यात यश आलं नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही हरिणी आपल्या कळपापासून वेगळी झाली होती. त्याचवेळी वानरांचा एक कळप तिच्या मागे लागला होता. या कळपापासून वाचण्यासाठी ही हरिणी एका उंच जागेवर चढली आणि तिथून पडूनच तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली. मात्र तिच्या शरीरावर कोणतीही जखम नसल्याने मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी वन विभागाकडून पुढील तपासणी करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा