अनधिकृत फेरीवाले हद्दपार

  Pali Hill
   अनधिकृत फेरीवाले हद्दपार
   अनधिकृत फेरीवाले हद्दपार
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांकडे आपला मोर्चा वळवत त्यांच्याविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. या कारवाईअंतर्गत पश्चिम उपनगरातील 149 अनधिकृत फेरीवाल्यांना हद्दपार केले आहे. अतिक्रमण निर्मुलन आणि अनुज्ञापन खात्याद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईत 140 हातगाड्या 65 शेगड्या आणि 63 सिलेंडर्स जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या नष्ट करण्यात आल्या असून शेगड्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती उपअनुज्ञापन अधिक्षक (प. उ.) प्रकाश जाधव यांनी दिली आहे. आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण, पी दक्षिण, पी उत्तर, के पश्चिम या सहा विभागांमध्येही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आता वाहतूककोंडीची समस्या सुटणार असून पादचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा पालिकेकडून केला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.