परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

Parel
परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
परळमध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा
See all
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
मुंबई  -  

परळ पूर्व येथील एस.एस.राव मार्गावर नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पदपथावर अनधिकृतरित्या ठाण मांडून बसलेले स्टॉल धारक, झोपड्या आणि वाहनांवर पालिकेच्या एफ दक्षिण विभागाकडून शुक्रवारी तोडक कारवाई करण्यात आली.

या मार्गावर केईएम रुग्णालय, महात्मा गांधी रुग्णालय, पशु वैद्यकीय रुग्णालय, महाविद्यालय आणि शाळा असल्याने नेहमीच येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. परंतु नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पदपथावर अनधिकृतरित्या स्टॉल, झोपड्या आणि वाहने उभी असल्याने नागरिकांना येथून चालताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका एफ दक्षिण विभागाच्या वतीने परळ पूर्व येथील एस. एस. राव मार्गापासून लालबाग मार्केटपर्यंत अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेल्या 16 स्टॉल, 20 झोपड्या, 4 सिमेंटचे चौथरे, 14 दुचाकी आणि 5 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आल्याचे एफ दक्षिण विभागाचे दुय्यम अभियंता संजय मोहिते यांनी सांगितले.

नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या पदपथावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पालिकेच्या वतीने वारंवार कारवाई करण्यात येत असते. त्याचप्रमाणे ही कारवाई करण्यात अाली असून, यामुळे नागरिकांसाठी पदपथ मोकळे करून देण्यात आले आहेत, असे एफ दक्षिण विभाग सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी सांगितले.

पदपथावरील अतिक्रण दिवसेंदिवस वाढीला लागले आहे. त्यात अनधिकृत गॅरेजवाल्यांची भर पडत आहे. या गॅरेजवाल्यांमुळे दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत असते. परिणामी वाहतूक कोंडी होतेच. त्याचबरोबर वाहने दुरुस्त करताना पदपथावर सर्वत्र ऑइल सांडल्याने चिखल होतो आणि ऑईलची दुर्गंधी देखील पसरते. यांच्यावर पालिकेने ठोस पावले उचलून कायम कारवाई करणे गरजेचे असल्याचे नितीन चाळके यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.