Advertisement

आशा सेविकांच्या मानधनात २ हजारांची वाढ, ठाकरे सरकारचा निर्णय

कोरोनाविरूद्धच्या लढाईत दिवस-रात्र झोकून देत काम करणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

आशा सेविकांच्या मानधनात २ हजारांची वाढ,  ठाकरे सरकारचा निर्णय
SHARES

कोरोनाविरूद्धच्या लढाईत दिवस-रात्र झोकून देत काम करणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय (ASHA workers will get 2 thousand rupees salary hike by maharashtra government ) घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात सध्या ७१ हजार आशा सेविका कार्यरत आहेत.

राज्यांमध्ये 'आशा' स्वयंसेविकांना ४ ते १० हजार रुपयांचा मोबदला मिळत असताना महाराष्ट्रातील 'आशा' स्वयंसेविकांना आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून महिन्याला केवळ १६०० रुपये मानधन मिळत आहे. त्यामुळे त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. अखेर या मागणीवर निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आशा सेविका व आशा गटप्रर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय घेत त्यांना दिलासा देण्यात आला आहे. 

त्यानुसार आशा सेविकांच्या मानधनात दरमहा २०००, तर आशा गटप्रर्तकांना मानधनात दरमहा ३००० अशी वाढ करण्यात आली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे. 

हेही वाचा - 'आशा' स्वयंसेविकांचं मानधन वाढवा, अमित ठाकरेंनी लिहिलं आरोग्यमंत्र्यांना पत्र

काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी सरकारला याबाबत पत्र लिहिलं होतं. विविध साथीच्या रोगांच्या सर्वेक्षणापासून गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यापर्यंत आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत मानसिक आजारांचं सर्वेक्षण करण्यापासून ते विविध लसीकरणास मदत करणे अशी ७०-७५ प्रकारची कामे आशा स्वयंसेविका निष्ठेने करत आहेत. सध्याच्या करोनाच्या महासाथीतही आशा स्वयंसेविका स्वत:चा जीव धोक्यात घालून उत्तम काम करत आहेत. 

असं असतानाही राज्यातील आशा स्वयंसेविकांना महिन्याला सरासरी २,५०० रुपये मानधन दिलं जात आहे. मुंबईतील आशा स्वयंसेविकांना तर केवळ १,६०० रुपये मासिक मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. मासिक मानधन म्हणून इतकी तुटपुंजी रक्कम देणे म्हणजे या स्वयंसेविकांचं एकप्रकारे आर्थिक शोषणच आहे. त्यामुळे त्यांचं मानधन वाढवा अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा