पालिकेच्या दबंगचा फिटनेस फंडा!

 Sandhurst Road
पालिकेच्या दबंगचा फिटनेस फंडा!

सँडहर्स्ट रोड - सहाय्यक आयुक्त उदय कुमार शिरुरकर यांनी सँडहर्स्ट रोड इथल्या बी वॉर्ड कार्यालयात व्यायाम शाळा सुरू केली आहे. या कार्यालयातल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी या व्यायामशाळेत जाण्याचे आवाहन केले आहे. ही व्यायामशाळा अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज असून व्यायामाचे धडे देणारा ट्रेनरसुद्धा इथे असणार आहे. तर बाहेरून येणाऱ्या नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येईल​. मात्र या व्यायामशाळेचे उद्घाटन पालिका निवडणुकीनंतरच केले जाईल, असे शिरुरकर याऩी सांगितले.

Loading Comments