Advertisement

बॉलिवूडच्या कोड्यात अडकले तरुण, अर्थव्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष - चेतन भगत

नागरिकांनी सातत्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता चेतन भगत यांनी व्यक्त केली.

बॉलिवूडच्या कोड्यात अडकले तरुण, अर्थव्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष - चेतन भगत
SHARES

सध्या देशाची आर्थिक अवस्था चांगली नाही यासंदर्भात सर्वांनाच माहित आहे. पण सर्वांचं लक्ष कंगना रणौत, शिवसेना वाद, सुशांत आत्महत्या या सर्वांमध्येच अडकलेलं आहे. यावरच लेखक चेतन भगत यांनी प्रतक्रिया दिली आहे.

लॉकडाऊनमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. परिणामी जीडीपीमध्ये मोठी घट झाली आहे. देशात सध्या अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान झालं आहे. असे असताना देशातील तरुणवर्ग याकडे दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांनी सातत्यानं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात मोठा फटका सहन करावा लागण्याची शक्यता चेतन भगत यांनी व्यक्त केली.

“देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नाही, हे सरकारला माहिती असते. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील संकटं दूर करण्यासाठी ते वेळ खर्च करीत नाहीत. जर लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, त्यांनी याबाबत मागणीच केली नाही तर राजकारणी लोक तरी याची काळजी का करतील?” असा सवाल भगत यांनी केला आहे.

रोजगारासंदर्भात चेतन भगत म्हणाले, “पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एकतर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल.”Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा