पोलिसांचे जनजागृती अभियान

 Reay Road
पोलिसांचे जनजागृती अभियान
पोलिसांचे जनजागृती अभियान
See all

रे रोड - संवेदशील परिसरातले स्थानिक एकजुटीने राहाण्यासाठी पोलिसांच्या वतीने जनजागृती अभियान राबवले जात आहे. हार्बर मार्गावरील रे रोड स्थानकानजीकच्या संत सावता माळी झोपडपट्टीमध्ये 60 टक्के बांग्लादेशी आणि 40 टक्के मुस्लीम लोकवस्ती आहे. या भागामध्ये सध्या मोहरमची धामधूम सुरू आहे. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी झोपडपट्टीवासियांना एकजुटीने राहाण्याचा संदेश दिला आहे. यावेळी एकमेकांना सहाय्य करा, धूम्रपान करू नका, कचरा रेल्वे रुळात टाकू नका, चालत्या लोकलवर दगड मारू नका. तसेच परिसरात अनोळखी अथवा संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना सुचित करा. अशा जनजागृतीपर सूचना येथील झोपडपट्टी वासियांना दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने झोपडपट्टीवासी उपस्थित होते. त्याचबरोबर स्टेशन प्रबंधक कुट्टी कृष्णन, हवालदार मंगेश साळवी, मनोज गुजर, कमांडो नितीन जाधव, संतोष गव्हाणे, अमोल पिसे, पोलीस कर्मचारी समिती सदस्य जहिर अली शेख, राजा जाधव यांची उपस्थिती होती.

Loading Comments