Advertisement

बोर्ड परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घाला: नितेश राणे

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, परीक्षा हॉलमध्ये मुलींना बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने कॉपी करणे सोपे होऊ शकते आणि सुरक्षेचे आव्हान निर्माण होऊ शकते.

बोर्ड परीक्षेत बुरखा घालण्यावर बंदी घाला:  नितेश राणे
SHARES

येत्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल चिंता व्यक्त करत महाराष्ट्राचे (maharashtra) मंत्री आणि भाजप (bjp) नेते नितेश राणे यांनी परिक्षा केंद्रांवर बुरखा (viel) परिधान करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे म्हणाले की, विद्यार्थिनींना परीक्षा हॉलमध्ये बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने कॉपी करणे सोपे होऊ शकते आणि सुरक्षेला आव्हान निर्माण होऊ शकते.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास खाते सांभाळणारे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुढे असा दावा केला की, परीक्षा हॉलमध्ये बुरखा घालण्याची परवानगी दिल्याने कॉपी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जात आहेत हे शोधणे कठीण होऊ शकते.

“दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बुरखा घालण्याची परवानगी देऊ नये. आवश्यक असल्यास, तपासणी करण्यासाठी महिला पोलिस अधिकारी किंवा महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि त्या पारदर्शकपणे घेतल्या पाहिजेत,” असे ते म्हणाले.

तथापि, मंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली.

माजी खासदार हुसेन दलवाई यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "मुली शिक्षण घेत आहेत हे स्वागतार्ह असले पाहिजे, मग त्यांनी बुरखा घातला असो वा नसो. त्यांना तो काढायला भाग पाडणे चुकीचे आहे.

परीक्षेला बसण्याच्या त्यांच्या अधिकारात अडथळा आणणे कायद्याविरुद्ध आहे. परंपरांचे उल्लंघन केले जाऊ नये. तसेच विद्यार्थी स्वाभाविकपणे स्वतः ठरवतील की काय आवश्यक आहे आणि काय नाही."



हेही वाचा

विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले

दहिसरमधील बेवारस वाहनांचा लिलाव

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा