SHARE

संविधान मूल्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरता मंगळवारी चेंबूर येथील संविधान संवर्धन समितीच्या वतीने बंधुता रॅली काढण्यात आली होती. चेंबूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पी. एल. लोखंडे मार्गावरील मातोश्री रमाबाई आंबेडकर भवनपर्यंत ही रॅली काढण्यात आली.

चेंबूर स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही बंधुत्व यात्रा चेंबूर स्थानक, डायमंड गार्डन, गोवंडी, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल, टेम्भी पूल, शेल कॉलनी, सुस्वागतमनगर मार्ग, पी. एल. लोखंडे मार्गावरील काढून शेवटी सांगता मातोश्री रमाबाई आंबेडकर भवन येथे करण्यात आली.

बंधुत्व यात्रेचे नेतृत्व हिरामण खंडागळे, वैशाली जगताप, मुमताज शेख, राजू रोटे, विश्वजित मिठबावकर, अल्पम साळवी, कालिदास रोटे, सुनील आहिरे, बाळू पवार आदींनी केले. या यात्रेमध्ये शाळकरी मुलांसह मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभाग घेतला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या