रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी

 Reay Road
रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी
रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी
रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी
रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी
रेल्वे स्थानकात विशेष घातपात तपासणी
See all

रे रोड - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्राप्त धमक्यांच्या अनुषंगाने कॉटन ग्रीन स्थानकात घातपात तपासणी करण्यात आली. वडाळा रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या वतीने वडाळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी शनिवारी करण्यात आली. यात रे रोड स्थानकात 21 संशयीत व्यक्ती आणि 15 बॅगांची तपासणी करण्यात आली. तर कॉटन ग्रीन स्थानकात 15 संशयीत व्यक्ती आणि 12 बॅगा तपासण्यात आल्या. मात्र आक्षेपार्ह काहीही आढळून आलेले नाही. दरम्यान रे रोड स्थानक स्टेशन प्रबंधक विनायक शेवाळे यांच्या उपस्थितीत रेल्वे प्रवासी पोलीस मित्र, स्थानकातील टी स्टॉल आणि बुट पॉलिश करणाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यात सुरक्षेबाबतच्या सूचना समजावून सांगण्यात आल्या. या वेळी पोलीस हवालदार मंगेश साळवी, महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Loading Comments