Advertisement

वांद्रे माउंट मेरीची जत्रा: 30 स्टॉल्स रिकामे

वाढत्या किंमती आणि स्टॉल वाटपाच्या नवीन पद्धती यामुळे काही पारंपारिक विक्रेते या जत्रेत सहभागी होणार नाही आहेत.

वांद्रे माउंट मेरीची जत्रा: 30 स्टॉल्स रिकामे
SHARES

मुंबईच्या (mumbai) वांद्रे (bandra) पश्चिम परिसरात 300 वर्षांपासूनचा माउंट मेरीची जत्रा (mount merry festival) प्रसिद्ध आहे. ही जत्रा अनेक स्टॉल्स, धार्मिक भक्ती, परंपरा आणि दृढ भावनेसाठी प्रसिध्द आहे.

तथापि, या वर्षी प्रतिष्ठित माउंट मेरी (mount merry) बॅसिलिकाच्या पायऱ्यांजवळ अनेक रिकामे स्टॉल असल्याचे दिसून आले.

दीर्घकाळ चालणाऱ्या स्टॉल मालकांचे असे म्हणणे आहे की ही जत्रा आपली जादू दाखवण्यास कमी पडत आहे. याचे कारण म्हणजे वाढत्या किंमती आणि स्टॉल वाटपाच्या नवीन पद्धती यामुळे काही पारंपारिक विक्रेते या जत्रेत सहभागी होणार नाही आहेत.

याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लादले गेलेले स्टॉलचे अवाजवी दर (high rent) आहे. पूर्वी वाजवी दरात उपलब्ध असलेल्या स्टॉलचा आता लॉटरी पद्धतीने आणि ऑनलाइन बोली प्रक्रियेद्वारे लिलाव केला जात आहे. ज्यामुळे दीर्घकाळापासून सहभागी होणारे विक्रेते नवीन किमतीत स्टॉल (stall) विकत घेऊ शकत नाहीत किंवा ते घेण्यास इच्छुक नाहीत.

1947 पासून मेळ्यात मिठाईचा स्टॉल चालवणारे विक्रेते रूपेश गोम्स यांनी जास्त खर्चाचे कारण देत यावर्षी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

“आम्ही आठ दिवसांसाठी सुमारे 15,000 रुपये भरायचो पण आता त्याची किंमत 65,000 रुपये इतकी झाली आहे. जी तात्पुरत्या स्टॉलसाठी हास्यास्पद आहे.” असे गोम्स म्हणाले.

रिकाम्या स्टॉल्सच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना गोम्स म्हणाले की, यावर्षी 150 पैकी किमान 30 स्टॉल्स रिकामे आहेत. सध्याच्या 550  रुपये प्रति चौरस फूट दर, तसेच जीएसटीने त्यांच्यासारख्या दीर्घकाळापासून सहभाग घेणाऱ्या अनेक विक्रेत्यांना निराश केले आहे.

एडना ॲब्रेओ यांनीही स्टॉल न लावण्याचे ठरवले आहे. त्यांच्या कुटुंबाने 80 वर्षांपासून माउंट मेरी फेअरमध्ये एक स्टॉल चालवला आहे. धार्मिक वस्तू विकल्या आहेत आणि नंतर स्नॅक्स विकले आहे.

ॲब्रेओ यांनी म्हटले की "प्रति चौरस फूट किंमत जी 2015 पासून 2022 पर्यंत 150 रुपये होती, ती 2023 मध्ये 350 रुपये आणि या वर्षी 550 रुपयांवर गेली आहे."आम्ही फक्त तात्पुरत्या काळासाठी जागा वापरत असताना जीएसटी का भरावा?" असा सवाल देखील त्यांनी केली आहे.

जत्रेची खास सांस्कृतिक ओळख नष्ट होत असल्याची भीती भाविकांना आणि स्टॉल मालकांना वाटते. गोव्यातील (goa) पारंपारिक मिठाईचे स्टॉल, जे एकेकाळी बिबिंका, दोडोल आणि काडियो बडियो सारख्या पदार्थांची विक्री करत होते ते यावर्षी विकले जाणार नाही.

गोम्स यांच्या म्हणण्यानुसार, जे काही मिठाईचे स्टॉल दिसत होते ते गोव्यातील विक्रेत्यांनी कमी केले आणि त्यांची जागा घेणाऱ्या कपड्यांच्या स्टॉल्सने जत्रेची शोभा आणखीन कमी केली आहे.

मायकेल फर्नांडिस, 80 वर्षांपासून माउंट मेरीच्या पायऱ्यांजवळ स्टॉल लावत आहेत. इतरांप्रमाणेच, त्यांनीही जत्रेची सांस्कृतिक ओळख गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. “इतके रिकामे स्टॉल मी कधीच पाहिले नाहीत.

गेल्या वर्षी, प्रति चौरस फूट 3,500 रुपये भरल्यानंतर मला 40,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक स्टॉल मालकांना आता आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे, असे फर्नांडिस म्हणाले.

नवीन स्टॉल वाटप पद्धतींवर महत्त्वाची टीका ही आहे की यामुळे बाहेरील लोक स्टॉलसाठी बोली लावू शकतात. गोम्स आणि ॲब्रेओ सारख्या विक्रेत्यांप्रमाणे प्रथेने अन् पिढ्यानपिढ्या जत्रेचा भाग असलेले पारंपारिक सहभागी यामुळे बाहेर ढकलले गेले. गोम्स म्हणाले, “आम्हाला प्लेसमेंट माहित आहे आणि आमचे ग्राहक आमच्याकडे गेल्या अनेक वर्षांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळे आमच्याकडे येतात.

माउंट मेरीची जत्रा हा केवळ व्यावसायिक कार्यक्रम नसून खोलवर रुजलेली सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. ॲब्रेओ सारख्या स्टॉल मालकांच्या म्हण्यानुसार, "या जत्रेचा समृद्ध इतिहास आणि समुदायाची भावना दूर होत आहे असे दिसते, म्हणून मदर मेरीच्या डोळ्यात देखील अश्रू येत आहे."



हेही वाचा

MMR मधल्या 9 नवीन प्रमुख प्रकल्पांना मंजुरी

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगद्यासाठी SGNP जवळील झोपड्यांवर हातोडा

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा